30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरआरोग्यनांदेड रुग्णालयातील घटनेनंतर आता घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 मृत्यू...

नांदेड रुग्णालयातील घटनेनंतर आता घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 मृत्यू…

नांदेड शासकीय रुग्णालयातील 24 तासात 24 रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ माजली असतानाच, आता औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातिल मागील 24 तासात तब्बल 18 रुग्ण दगवल्याचे समोर आले आहे. यात 2 नवजात बालकांचाही समावेश आहे. नांदेडमधील घटनेनंतर राज्यभरात संतांपाचे वातावरण असतानाच औरंगाबादमधील घटनेने सामान्य नागरिक हतबल झाले असून नागरिकांना राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांची समिती आज मंगळवार, (3 ऑक्टोबर) नांदेडला गेली आहे. त्याचसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील नांदेडमधील रुग्णालयाला भेट देणार आहेत.

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत होती.

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात मागील 24 तासात 18 मृत्यू झाले असुंन घाटी रुग्णालयात केवळ 15 दिवसांचा औषधसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. आज मंगळवारी, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घाटी रुग्णालयाला भेट दिली.


यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्या ‘X” (पूर्वीचे ट्विटर) वरुण पोस्ट करत म्हणाले, “”नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली….!”

हे ही वाचा 

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यु; उद्या चौकशी समिती जाणार

‘द व्हॅक्सीन वॉर’कडे प्रेक्षकांची पाठ

जातनिहाय जनगणनेच धार्मिक उन्माद संपेल – जनता दल (यू) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा आशावाद

नांदेडच्या घटनेवरून कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप वर टीका करत म्हंटले, “महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी सर्व शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार आपल्या प्रसिद्धीवर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही.”


याअगोदर, ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 22 रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. असे असताना, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णाचा मृत्यू झाला. आणि आता औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 रुग्ण दगावल्याने गाढ झोपेत असलेली महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कधी जागी होईल? असा प्रश्न पडला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी