30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरआरोग्यआयुष्यमान भारत योजनेच्या 'स्कॅन अॅन्ड शेअर' सेवेमुळे रुग्णालयात रांगेत उभे राहण्याची कटकट...

आयुष्यमान भारत योजनेच्या ‘स्कॅन अॅन्ड शेअर’ सेवेमुळे रुग्णालयात रांगेत उभे राहण्याची कटकट मिटली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी महत्त्वकांक्षी असलेली आयुष्यमान भारत ही योजना रुग्णांसाठी सहाय्यभूत ठरत अल्याचे दिसून येत आहे. आयुष्यमान भारत योजनेव्दारे गरीब कुटुंबातील रुग्णांना उपचारांसाठी मोठा फायदा होत आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या योजनेअतंर्गत सक्षम आरोग्यसेवा देण्यासाठी ‘स्कॅन आणि शेअर’ (आभा) या डिजिटल सेवेला सुरुवात झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत 10 लाख रुग्णांची नोंदणी झाली असून गेल्या महिन्यात (23 फेब्रुवारी 2023) या सेवेद्वारे 5 लाख रुग्णांची नोंदणी केली गेली असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या सेवेबद्द्ल सांगितले की, आभा सेवेचे मुख्य़ उद्दिष्ट हे डिजिटल पध्दतीने सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे आहे. या योजनेव्दारे रुग्णालये रुग्णांना स्कॅन आणि शेअर नोंदणीच्या आधारे डिजिटल अपॉईमेंट देत आहेत. त्यामुळे रुग्णांना तासंतास रांगेत उभे रहावे लागत नाही. सध्या दररोज सरासरी 25 हजार रुग्ण या योजनेतून ओपीडी सेवा घेत आहेत. तर आता लवकरच दररोज १ लाख रुग्ण या सेवेव्दारे टोकन घेतील असा अंदाज आहे.

आयुष्यमान भारत योजनेतील स्कॅन आणि शेअर सेवा ही क्यूआर कोड आधारित सेवा असून ती थेट सहभागी रुग्णालये त्यांच्या रुग्ण नोंदणी काउंटरवर त्यांचे विशिष्ट क्यू आरकोड प्रदर्शित करतात. रुग्ण, या सेवेसाठी मोबाइल ॲप वापरून क्यू आरकोड स्कॅन करण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून आपली नोंदणी करतात. सध्या स्कॅन आणि शेअर सेवा ABHA ॲप, आरोग्य सेतू, ड्रायफकेस, पेटीएम, बजाज हेल्थ आणि ई केअर यांच्याशी संलग्न केले आहे. डिजिटल आरोग्य प्रोत्साहन योजनेविषयी सविस्तर माहिती https://abdm.gov.in/DHIS या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
हे सुद्धा वाचा
मॅगीनंतर आता अंडयावर प्रयोग: वेफर ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये संतापले; सोशल व्हायरल
करुणा मुंडे बीडमध्ये धनंजय मुंडेंना देणार चॅलेंज; शिवशक्ती सेना पक्षाची केली स्थापना
कर्नल पुरोहितांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी