आपले शरीर सुंदर बनवण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण आंघोळ करताना या छोट्या गोष्टीचा वापर करू शकता. त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. ती गोष्ट म्हणजे तुरटी. (bathing with alum water benefits)
ब्रश केल्यानंतर तोंड धुताना पाण्यात मिसळा ‘ही’ गोष्ट, दातांचा पिवळेपणा होईल दूर
तुरटीचे अनेक फायदे आहेत. शरीरातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणूनच तुम्ही पहिला असेल की पुरुषांच्या शेव्हिंग किटमध्ये तुरटीचा एक तुकडा नेहमीच असतो. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचेवर तुरटी वापरल्याने अनेक फायदे होतात. हो तुरटी वापरल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तुरटीचा वापर केल्याने डाग आणि सुरकुत्या दूर होतात. तसेच, डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज देखील कमी होते. (bathing with alum water benefits)
आपण आपला चेहरा तसेच शरीर सुंदर बनवण्यासाठी खूप काही नवीन क्रीम्सचा वापर करतो. पण त्याच्या वापरामुळे आपल्याला त्रास देखील होते. पण तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून रोज आंघोळ केली तर शरीर चमकदार बनते आणि अनेक आजारांपासून दूर राहता येते. (bathing with alum water benefits)
चेहऱ्यावर हळद लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या
काळी वर्तुळे कमी करते
जर तुमच्या डोळ्यांखाली सूज आली असेल किंवा काळी वर्तुळे असतील तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटी आणि गुलाबपाणीच्या मिश्रणाने तुमचे काळे वर्तुळ कमी होतील. तुरटीच्या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे तशीच राहू द्या. यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. (bathing with alum water benefits)
शरीराची दुर्गंधी निघून जाईल
तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातून येणारी दुर्गंधी कमी होते. तसेच, बॅक्टेरिया आणि घामापासून आराम मिळतो. तुरटी त्वचेला टोनिंग आणि घट्ट बनवण्यास मदत करते. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. (bathing with alum water benefits)
सांधेदुखीपासून आराम
त्वचेशिवाय, तुरटीमुळे सांधेदुखी देखील कमी होते. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास केस मजबूत, चमकदार आणि सुंदर होतात. एवढेच नाही तर तुमच्या शरीरावर काही जखमा असल्यास तुरटीचे पाणी जखम भरून येण्यास मदत करते.
तुरटीचा वापर
एका बादली पाण्यात तुरटीचा छोटा तुकडा टाका, पाणी चांगले मिसळा. यानंतर या पाण्याने आंघोळ करा. एवढेच नाही तर शॅम्पूसाठी तुरटीचा तुकडाही पाण्यात टाकू शकता. (bathing with alum water benefits)