राग येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु जर तुम्हाला खूप राग आला आणि नंतर पश्चात्ताप झाला, तर तुम्ही वेळीच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधावेत. कारण अति रागामुळे उच्च रक्तदाबासारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. (benefit of sheetali pranayama)
हिवाळ्यापूर्वीच त्वचा कोरडी होत आहे का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच
जर तुमच्या समोर काही चुकीचे घडले आणि ते पाहून तुम्हाला राग आला तर ही एक सामान्य प्रक्रिया आहे, परंतु जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवत नाही तर ही समस्या आहे. निरोगी राहण्यासाठी तुमचे मन शांत राहणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही प्राणायामाची मदत घेऊ शकता. (benefit of sheetali pranayama)
‘हे’ पांढरे पदार्थ आरोग्यासाठी असू शकतात हानिकारक
शीतली प्राणायामाचे फायदे
1. शीतली प्राणायामचा नियमित सराव केल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक फायदा होईल. हा प्राणायाम शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. (benefit of sheetali pranayama)
- रोज शितली प्राणायाम केल्याने शरीरात ताजेपणा येतो आणि व्यक्तीला चांगले वाटते.
- शितली प्राणायाम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्ती शांत वाटते.
- शितली प्राणायामचा नियमित सराव चिंता कमी करण्यास उपयुक्त आहे. ज्यामुळे अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.
- या प्राणायामामुळे तुमच्या मनातील शांती आणि सौहार्दाची भावना वाढते, ज्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- अनेक वेळा एखादी व्यक्ती उच्च रक्तदाबाची तक्रार करते, ज्यामुळे चिडचिड आणि राग येतो. अशा परिस्थितीत शितली प्राणायामचा नियमित सराव केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
- शीतली प्राणायाम श्वसन प्रणाली मजबूत करते आणि श्वासोच्छवासाच्या समस्या कमी करू शकते.
- शितली प्राणायाम उत्साह वाढवू शकतो, ज्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- शितली प्राणायामाचा सराव केल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि मन शांत होते. (benefit of sheetali pranayama)
शितली प्राणायाम कसा करावा?
-या प्राणायामाचा सराव करण्यासाठी आधी शरीराला आराम द्या आणि ध्यानाच्या मुद्रेत बसा आणि गुडघ्यांवर हात ठेवा. (benefit of sheetali pranayama)
-आता जीभ बाहेर काढा आणि हळूहळू तोंडातून श्वास घ्या.
-काही सेकंदांसाठी श्वास रोखून ठेवा आणि नंतर श्वास सोडा.
-या प्राणायामचा 15 ते 20 वेळा नियमित सराव केल्याने तुम्हाला फायदे दिसू लागतील. (benefit of sheetali pranayama)