33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यBMC बसवणार ५००० सॅनिटरी पॅड डिस्पेंसर मशिन्स ; झोपडपट्टी भागांवर लक्ष केंद्रित

BMC बसवणार ५००० सॅनिटरी पॅड डिस्पेंसर मशिन्स ; झोपडपट्टी भागांवर लक्ष केंद्रित

मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छता योजनेच्या अनुषंगाने बीएमसीने हा उपक्रम सुरू केला आहे.

महिलांच्या आरोग्याच्या हिताने राज्यात सॅनिटरी पॅडचा (Menstrual pad) वापर वाढत असताना, त्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान राज्यातील सर्वच महापालिकांसमोर आहे. या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) प्रत्येक प्रभागात पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे, ज्यात शहरातील झोपडपट्टी विभागांत लक्ष केंद्रित केले जाईल. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, बीएमसीने 5000 वॉल-माउंटेड सॅनिटरी पॅड डिस्पेंसिंग मशिन्स बसवण्यासाठी निविदा काढल्या आहेत. त्यासोबत तीन वर्षांच्या देखभालीच्या करारासह हे उपक्रम राबविण्यात येईल. या एका मशीनची किंमत सुमारे 60,000 रुपये प्रति युनिट आहे. मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्वच्छता योजनेच्या अनुषंगाने बीएमसीने हा उपक्रम सुरू केला आहे. (BMC will install 5000 sanitary pad dispenser machines in slum area)

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडचा वापर वाढावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रयत्न करते आहे. कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटीबाबतही महापालिका जागरूक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा खूप मोठा उपक्रम असणार आहे. या उपक्रम लाखो मुंबईकरांच्या आरोग्याच्या हिताचा असणार आहे. बीएमसीतर्फे मुंबईतील 5000 सार्वजनिक शौचालयांमध्ये वापरलेल्या पॅडसाठी इन्सिनरेटरसह 500 सॅनिटरी पॅड वितरण युनिट्स बसवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, 5000 सार्वजनिक शौचालयांमध्ये ही मशीन्स बसविण्यात येणार आहे, ज्यात शहरातील झोपडपट्टी भागांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘घरगुती सॅनिटरी पॅड आणि डायपर हा वैद्यकीय कचरा असून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागात सॅनिटरी पॅड डिस्पोजल युनिट्स बसवत आहोत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या कचऱ्याची विल्हेवाट स्वतंत्रपणे लावणे गरजेचे आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचेही नुकसान टाळता येणार आहे,’ अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  BMC News: महानगरपालिका मुंबई शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवणार नवीन उपक्रम

BMC Exclusive : शौचालयात कपडे धुवा, मोबाईल चार्जिंग करा आणि एटीएमने पैसेही काढा

OMG : अरे देवा! १० पैकी एकाला कोरोनाचा संसर्ग

मुंबई शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा दोन कोटीच्या आसपास आहे. त्यापैकी 65 लाख नागरीक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मुंबईत जवळपास 15 ते 20 हजार झोपडपट्ट्या आहेत. मुंबईत एवढी मोठी झोपडपट्ट्यांची संख्या आहे. याचाच अर्थ एकूण लोकसंख्येपेक्षा निम्म्याहून अधिक नागरीक हे झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. या सर्व नागरिकांना राज्य सरकारने खूप मोठा दिलासा दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच या टॉयलेट ब्लॉक्ससाठी वॉल-माउंटेड सॅनिटरी पॅड डिस्पेंसिंग मशिन्स बसवण्यासाठी निविदा काढल्या आहेत, त्यासोबत तीन वर्षांच्या देखभालीच्या करारामध्ये ह्या मशीन्सचे उत्पादन संपणार नाहीत याची खात्री करणे आणि स्टॉक संपल्यास काही तासांत बदलने असे नमूद केले आहे.

या निविदेतील करार :
१) प्रत्येक मशिनमध्ये एका वेळी 45 ते 60 सॅनिटरी नॅपकिन्स -उघडलेले किंवा दुमडलेले वितरीत करण्याची क्षमता असेल.
२) मशीन नॅपकिन्सचा एक संपूर्ण पॅक वितरीत करेल, ज्यामध्ये विविध वैशिष्ट्यांचे सॅनिटरी पॅडचे तीन युनिट असतील.
३) दिवसाला किमान 150 नॅपकिन्स वितरित करण्याची क्षमता सहन करेल.
४) नॅपकिन्स खरेदीसाठी वाटप केलेल्या स्लॉटमध्ये नियुक्त रुपये टाकून ते मिळवले जातील, कारण खरेदीची किंमत नागरी संस्थेने अद्याप निश्चित केलेली नाही.
५) मशीन वेब-आधारित असतील आणि वापर आणि उपलब्ध साठा याबद्दल इलेक्ट्रॉनिक डेटा तयार करतील, जो प्रभाग स्तरावर ऑनलाइनद्वारे सुरु केला जाऊ शकतो.
६) मशिनमधील साठा संपल्यावर, स्टॉक नसल्याची/ संपल्याचे चिन्ह दिसून येईल आणि मशिनची देखभाल करणारे कंत्राटदार ते संपल्यानंतर पाच तासांच्या आत साठा पुन्हा भरण्यास जबाबदार असतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी