27 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरआरोग्यPHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

बॉलिवूडमधील अभिनेत्र्या ज्या सामर्थ्य आणि फिटनेसच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत.

बॉलिवूड किंवा इतर कोणत्याही चित्रपटात काम करणे सोपे नाही, हा एक मागणी करणारा व्यवसाय आहे आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.अभिनेता किंवा अभिनेत्रीला त्यांच्या अभिनय कौशल्याला चमक देण्याव्यतिरिक्त, कलाकारांना तंदुरुस्त राहण्यासाठी कठोर आहार आणि व्यायामाचे नियम पाळावे लागतात. यामुळेच अनेक कलाकार फिटनेसचे शौकीन दिसतात.बॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्रांबद्दल बोलायला गेलो तर आताच्या चित्रपटातू ते दिवस गेले जेव्हा चित्रपटांमधील लीड मुलगी मुख्यतः संकटात असायची, गुंडांपासून स्वतःला वाचवता येत नाही आणि कोणत्याही गोष्टीसाठी ‘नायकावर’ पूर्णपणे अवलंबून असायची. कालांतराने आता आपल्याकडे आघाडीच्या महिला आहेत ज्या सामर्थ्य आणि फिटनेसच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोण

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

‘ओम शांती ओम’ मधून चित्रपट सृष्टीत प्रवेश करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण बद्दल कोणाला माहित नाही.दीपिका राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड बॅडमिंटनपटू आहे. ती तिच्या फिटनेस च्या बाबतीत कधीही कुचराई करत नाही. जिम,योगा,डायट यांवर तिचा फार लक्ष असतं.

अभिनेत्री रकुलप्रीत सिंग

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

साउथ आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमवणारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग ही फक्त तिच्या चित्रपटांसाठी नाही तर तिच्या फिटनेस विषयी फार चर्चेत असते. तिचे मसल्स आणि बायसेप्स पाहून,ती तिच्या बॉडीला फिट ठेवण्यासाठी खुप कडक ट्रेनिंग आणि विशेष मेहनत घेते हे दिसुन येते.

अभिनेत्री सुष्मिता सेन

SUSHMITA SEN

जर तुम्ही सुष्मिता सेनच्या इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असेल, तर तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. सुष्मिता नेहमी इंस्टाग्राम तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिचे बायसेप्स, शोल्डर आणि ॲब्ज हे पाहिलेत तर नक्कीच कुणीही नवल करतील.

हे सुद्धा वाचा

Video : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’!

Narayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा

Mantralaya :प्रेयसीला मृत्यूनंतरही न्याय मिळेना; तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेत्री मलाइका अरोडा

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

मलाइका अरोडाला योग केंद्रा पासून जिमला जाताना पाहणे हा लोकांसाठी एक सामान्य सीन बनला आहे.ती तिचा वर्कआउट सेशन कधीच मिस नाही करत. मलाइका तिचे वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.ती खरोखर आपल्या 9फिटनेसला खुप गांभीरयाने घेते, आपल्या एब्स आणि टोंड शरीरासाठी ती खुप मेहनत घेते.

व्हिडिओ जॉकी बानी

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनतव्हिडिओ जॉकी असलेली बानी ही फिटनेस प्रेमी आहे. ती तिचे बायसेप्स आणि टोंड शरीर अभिमानाने मिरवते ती तिचा जास्तीत जास्त वेळ जिम मध्ये व्यतीत करते.

अभिनेत्री कतरिना कैफ

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनतकॅटरिनाचा कैफ निःसंशयपणे बॉलिवूडमधील सर्वात योग्य अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आठवड्यातून सहा वेळा ३-४ तास वर्कआउट करते.कॅटरिनाचा डायट प्लॅन सुद्धा खूप स्ट्रिक्ट आहे. आपल्या शरीराला सुंदर आणि फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी