30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरआरोग्यब्रेकिंग! 'या' दिवसांमध्ये बुस्टर डोस मिळणार मोफत; केंद्र सरकारचे मोठे पाऊल

ब्रेकिंग! ‘या’ दिवसांमध्ये बुस्टर डोस मिळणार मोफत; केंद्र सरकारचे मोठे पाऊल

टीम लय भारी 

दिल्ली : कोरोना लसीकरणातील ‘बुस्टर डोस’विषयी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलै पासून पुढील 75 दिवस बुस्टर डोस मोफत देणार असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज याबाबत (दि. 13 जुलै) घोषणा केली आहे.

भारत देश यावर्षी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून बुस्टर डोस लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस बुस्टर डोस 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत देणार असल्याचे मंत्री ठाकूर यांनी सांगितले आहे.

बुस्टर डोस कोण घेऊ शकते ?

ज्या व्यक्तीने दोन्ही डोस घेतले आहेत आणि दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल तर अशा व्यक्ती बुस्टर डोस साठी पात्र आहेत. बुस्टर डोस घ्यायचे असल्यास जवळच्या लसीकरण केंद्रावर नोंदणी करून डोस घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : बीएमसीच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची पावसाने दिली पोचपावती

राज्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!