30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरआरोग्यसावधान ! कोरोना पुन्हा पाय पसरतोय, महाराष्ट्रात झपाट्याने फैलाव

सावधान ! कोरोना पुन्हा पाय पसरतोय, महाराष्ट्रात झपाट्याने फैलाव

देशात केरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार याबाबत सतर्क झाले असून आरोग्य विभागाला त्यासंदर्भात सुचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 397 एवढी होती. तर सोमवारी त्यात वाढ होऊन सोमवारी ती 205 वर पोहचली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोरोनाची चाचणी देखील पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती त्यांनी ट्विटवरुन दिली आहे.

मुंबईत देखील रुग्णसंख्या वाढत असून मंगळवारी (दि.२८) रोजी 135 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. मुंबईत आज 11 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून 2 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहे. मुंबईत सध्या ५२३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील कोरोनाच्या वाढ्त्या स्थितीबाबत व्हिडीओ काँन्फरंसच्या माध्यमातून सोमवारी (दि. २७) राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत बैठक घेतली. राजेश भूषण यांनी यावेळी २२ मार्च रोजी उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनांचा उल्लेख केला आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे आवाहन केले. 25 मार्च रोजी संशोधन विभाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाव्दारे जारी करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच आरटी-पीसीआर आणि जीनोम सीक्वेंसिंगचाचण्यांचा वेग वाढविण्याच्या सुचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

देशभरात कोरोना रुग्णवाढीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ३ मार्च रोजी आठवड्याभरात सरासरी ३१३ रुग्ण आढळत होते. त्या तुलनेत २३ मार्च रोजी ही संख्या वाढून ९६६ इतकी झाली आहे. या काळात आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण वाढीची संख्या १.०८ टक्क्यांवर जात आहे.

महाराष्ट्रात आठवड्याचा कोरोना पॉझिटीविटी दर ३ मार्च रोजी आठवडयाभरात 0.54 टक्के होता. तो 24 मार्च रोजी 4.54 टक्के इतका वाढला आहे. गुजरातचा 0.07 टक्यांपासून 2.17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. केरळचा 1.47 टक्क्यांवरुन 4.51 टक्क्यांवर गेला आहे. कर्नाटकचा 1.65 टक्क्यांवरुन 3.05 टक्यांवर गेला आहे. दिल्लीचा 0.53 टक्क्यांवरुन 4.25 टक्क्यांवर गेला आहे. हिमाचल प्रदेशचा कोरोना रुग्णवाढीचा दर 1.92 टक्क्यांवरुन 7.48 टक्क्यांवर गेला आहे. राजस्थानमध्ये हा आकडा 0.12 वरुन 1.62 टक्के झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये तो 0.46 टक्क्यांवरुन 2.40 टक्यांवर गेला आहे. देशातील 24 जिल्ह्यामध्ये २४ मार्च रोजी आठवड्याच्या शेवटी 10 टक्क्यांहून अधिक कोरोना पॉझिटीव्हीटीचा दर नोंद झाला आहे. तर 43 जिल्ह्यांमध्ये या काळात 5 ते 10 टक्यांच्यामध्ये कोरोना पॉझिटीव्हिटीचा दर नोंद झाला आहे.

हे सुद्धा वाचा

आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदतवाढ !
ठाणेकरांनी पळविले मुंबईचे पाणी; वागळे इस्टेट बोगदा कांड : जितेंद्र आव्हाड
संजय शिरसाठ विकृत आमदार : सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी