34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यCoronavirus : रूग्णांची संख्या 89, मुंबईत 14 आढळले

Coronavirus : रूग्णांची संख्या 89, मुंबईत 14 आढळले

Coronavirus : शरद पवारांचे आवाहन, परिस्थिती गंभीर आहे; घरातच थांबा

 

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव ( Coronavirus ) महाराष्ट्रातही वाढत चालला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वाने घराबाहेर पडू नका असे सांगितले आहे. तरीही अनेक ठिकाणी लोकांचे घोळके पाहायला मिळत आहेत. बाहेरच्या देशातील परिस्थिती लक्षात घ्या. घराबाहेर पडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केले आहे.

शरद पवार यांनी फेसबुकद्वारे हे आवाहन केले आहे. बंधू भगिनींनो कोरोनासंबंधी केंद्र व राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. हे निर्णय गांर्भियार्ने घेऊन त्यांचा अंमल करा. अनेक ठिकाणी, शहरांत, वस्तींमध्ये लोकांचे घोळके पाहायला मिळत आहेत. इतर देशांतील परिस्थिती सुद्धा गंभीर झाली आहे. आपणही गांर्भिर्याने काळजी घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढत आहे. अतिशय अपरिहार्य कारण असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा घराबाहेर पडू नका. देशाच्या व राज्याच्या नेतृत्वाने जे आवाहन केले आहे ते गांभिर्याने घ्यावे. कोरोनाच्या विरोधातील लढाई आपण जिंकणारच आहोत. पण समंजस व संयमपणाची गरज आहे, असे पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

गर्दी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई होईल :  राजेश टोपे

मुंबई : ‘कोरोना’ग्रस्तांची ( Coronavirus ) संख्या वाढतच चालली आहे. आज आणखी १५ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४ जण मुंबईचे आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ग्रस्तांची एकूण संख्या ८९ एवढी झाली असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नव्या रूग्णांपैकी आठजणांना संपर्कातून ‘कोरोना’ झाला आहे. उर्वरीत परदेशातून आलेले आहेत. बाहेरून आलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांचेच ( Coronavirus ) हे आठजण नातलग आहेत. निकटच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. हा आजार बरा होतो. ८९ पैकी दोनजण आयसीयूमध्ये आहेत. अन्य लोक व्यवस्थित आहेत. बऱ्याचजणांना तर कसलाही त्रास होत नसल्याचे ते म्हणाले.

राज्यातील नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नका. पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नका. गर्दी केली तर पोलीस कारवाई होईल. जमावबंदी आदेशाचे जनतेने तंतोतंत पालन करावे. सगळ्यांच्या हितासाठी हे करावेच लागेल. पोलिसांना कलम १४४ अंतर्गत लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार पोलीस योग्य ती कारवाई करतील असा इशारा सुद्धा टोपे यांनी दिला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नव्याने चाचणी प्रयोगशाळा सुरू होत आहेत. गोव्याची सीमा बंद केली आहे. आणखी काही सीमा बंद करण्याबाबत विचार सुरू आहे. वडिलधारी, मुले यांची काळजी घ्या. जे आजारी आहेत, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहीजे. अशा लोकांनी बाहेर जाऊ नये. सोशल डिस्टन्शींग ठेवा, असे आवाहन करतानाच आपण येथून पुढे पत्रकार परिषद सुद्धा फेसबुकवरूनच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

WarAgainstVirus : शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेही उत्कृष्ट काम करीत आहेत : जितेंद्र आव्हाड

Covid-19 : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या सीमा सीलबंद करणार : राजेश टोपे

नरेंद्र मोदींची नाराजी : जनता ‘लॉकडाऊन’ गांर्भिर्याने घेत नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी