29 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरआरोग्यकोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

कोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

टीम लय भारी 

सलग दोन वर्षे संपुर्ण देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असे वाटत असताना कोरोना संसर्ग देशात झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासांत देशात तब्बल 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने सुरक्षिततेचे नियम पाळत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाचा धोका टळला नसला तरी संसर्ग कमी झाल्यामुळे देशभरासह राज्यातील कोरोना निर्बंध पुर्णपणे शिथिल करण्यात आले होते, परंतु पुन्हा कोरोना संसर्गाची आकडेवारी वाढू लागल्याने नागरिकांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य प्रशासनाची सुद्धा चिंता वाढली आहे. सध्या देशात एक लाख  49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत तर सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांचा आकडा लवकरच पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात अॅक्टिव कोरोना रुग्णांसह संसर्गामुळे दगावणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली असून देशात काल (गुरुवारी) संपुर्ण दिवसभरात 60 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला त्यामुळे आणखी चिंतेत भर पडली आहे. देशात सध्या कोरोना संसर्ग झालेले एकूण 1 लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात सुद्धा कोरोना संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे. गुरूवारी महाराष्ट्रात 2289 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर गेल्या 24 तासांत एकूण 2400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेले रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत . राज्यात काल सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नेते एकनाथ खडसे यांच्या हटके शुभेच्छा

VIDEO : शिंदे सरकारचा ‘आरे’वर घाव!

द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती’ पदावर विराजमान

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!