29 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरआरोग्यगणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचा धोका; ठाण्यात फैलाव, एकाचा मृत्यू

गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचा धोका; ठाण्यात फैलाव, एकाचा मृत्यू

कोविड 19 मुळे सलग 2 वर्षे सबंध मानवजातीला वेठीस धरले होते. अनेकांनी आपले अत्यंत जवळचे नातेवाईक कोरोना काळात गमावले. अतोनात हाल, नुकसान झालेल्या लोकांचे आता काहीसे सुरळीत होत असताना गणेशोत्सवाच्या तोंडवर पुन्हा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. ठाणे महापालिका हद्दीत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

महापालिका क्षेत्र वगळून ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात 63 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये मंगळवारी (दि.12) रोजी दिवसभरात 14 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आजअखेर ठाणे जिल्ह्यात 7 लाख 52 हजार 739 रुग्णांची नोंद झाली असून 7 लाख 41 हजार 461 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान मंगळवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे महापालिका हद्दीत आज 13 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आजअखेर दोन लाख 13 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आठवडाभरात 41 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी 1 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 हजार 177 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे. तर आतापर्यंत ठाणे महापालिका हद्दीत 1 लाख 97 हजार 795 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवारी एका कोरोना रुग्णाची नोंद झाली असून आतापर्यंत 1 लाख 70 हजार 796 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केडीएमसी महापालिका हद्दीत आठवडाभरात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. केडीएमसी महापालिका हद्दीत आतापर्यंत 1 लाख 67 हजार 824 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

नवी मुंबई महापालिका हद्दीत आठवडाभरात सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका हद्दीत आतापर्यंत 1 लाख 67 हजार 355 कोरोना रुग्ण आढळून आले असून 1 लाख 65 हजार 291 रुग्ण बरे झाले आहेत. उल्हासनगर पालिका हद्दीत आठवडाभरात शुन्य कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. उल्हासनगर पालिका हद्दीत आतापर्यंत 27 हजार 486 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 26 हजार 820 कोरोना रुग्ण बरे झाल्यांची नोंद आहे.

हे सुद्धा वाचा
शासन आपल्या दारी ? शेतकऱ्यांचा संसार सरणावरी…आठ महिन्यात मराठवाड्यात ६८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

देशात मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांच्या नरसंहाराची शक्यता : प्रकाश आंबेडकर 

दणादण चित्रपट आपटल्यानंतर किंग खानचबद्दल ‘या’ अभिनेत्याची प्रतिक्रिया बदलली  

भिवंडी-निजामपूर महापालिका हद्दीत आठवडाभरात शुन्य रुग्णांची नोद झाली आहे. महापालिका हददीत आतापर्यंत 13 हजार 3 रुग्णांची नोंद झाली असून, 487 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12हजार 514 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महापालिका हद्दीत एकही बाधित रुग्ण नाही. मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत आठवडाभरात दोन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आठवडाभरात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आता पर्यंत मिराभाईंदर महापालिका हद्दीत 72 हजार 457 कोरोना रुग्ण आढळले असून 1 हजार 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 71 हजार 50 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.

अंबरनाथ पालिका हद्दीत आठवडाभरात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नसून आतापर्यंत 24 हजार 438 रुग्ण सापडले आहेत. तर 580 रुग्णांचा मृत्यू झाला असून 24 हजार 611 रुग्ण बरे झाले आहेत. कुळगाव-बदलापूर पालिका हद्दीत आठवडाभरात एक रुग्ण आढळून आला आहे. कोरोना साथ सुरु झाल्यापासून आतापर्यंत 26 हजार 63 रुग्णांची नोंद कुळगाव बदलापूर पालिका हद्दीत झाली असून 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 25 हजार 692 कोरोना रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आठवडाभरात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत ग्रामीण भागात 51 हजार 128 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 1 हजार 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 49 हजार 864 रुग्ण बरे झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी