31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच असल्याचे चित्र आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा याेजना रूग्णालय व इएसआयसीच्या लाेकल ऑफिसच्या गलथान कारभार अपघातग्रस्त कामगारांसाठी जीवघेणा ठरत आहे. कारखान्यात काम करताना दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हाताचा अंगठा तुटलेल्या कामगाराची रात्री ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या टायप हाॅस्पिटलमध्ये हेळसांड सुरू हाेती. या जखमी कामगारावर चक्क रात्री ११ वाजता मुंबईनाका परिसरातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दाेन्ही यंत्रणांनी एकमेकांकडे बाेट दाखवत आपआपली जबाबदारी झटकली.

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही कामगारांचे आराेग्य (health) मात्र अधांतरीच असल्याचे चित्र आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा याेजना रूग्णालय व इएसआयसीच्या लाेकल ऑफिसच्या गलथान कारभार अपघातग्रस्त कामगारांसाठी (workers health) जीवघेणा ठरत आहे. कारखान्यात काम करताना दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हाताचा अंगठा तुटलेल्या कामगाराची रात्री ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या टायप हाॅस्पिटलमध्ये हेळसांड सुरू हाेती. या जखमी कामगारावर चक्क रात्री ११ वाजता मुंबईनाका परिसरातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. कामगारांच्या जीवाशी (workers health) खेळणाऱ्या या दाेन्ही यंत्रणांनी एकमेकांकडे बाेट दाखवत आपआपली जबाबदारी झटकली.(Despite paying Rs 13 crore a month to ESIC for the welfare of workers, the health of the workers remains incomplete.)

सातपूर येथे राज्य कामगार विमा याेजना रूग्णालय (इएसआय हाॅस्पिटल) आहे. हे रूग्णालय पुर्णपणे विमा रूग्णालय आहे. औद्याेगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील उद्याेजक इएसआयसी (राज्य कामगार विमा महामंडळ (दिल्ली) यांना प्रत्येक महिन्याला १३ काेटी रूपये अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये भरतात. या पैशातून कामगार रूग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देणे अवश्यक आहे. विमा रूग्णालय असल्यामुळे हा कामगारांचा प्रथम अधिकार असताना राज्य शासनाचे दुर्लक्ष व स्थानिक पातळीवरील गलथान कारभाराचा फटका कामगारांना बसत आहे. सातपूर औद्याेगिक वसाहतीत काम करणाऱ्या मुकेश कुमार या कामगाराचा दुपारी दिड वाजेच्या सुमारास अपघात घडल्यानंतर त्याला तातडीने सातपूर येथे पाठवण्यात आले. मात्र त्याच्या हाताचा अंगठा तुटल्याने त्याच्यावर तातडीने प्लास्टीक सर्जरी करणे गरजेचे हाेते. इएसआय रूग्णालयाने त्यांना शहरातील दाेन तीन रूग्णालय रेफर केले. मात्र इएसआयचा रूग्ण असल्याने व त्यांच्याकडून लवकर पैसे मिळत नसल्यामुळे जखमी कामगारास दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. एका हाॅस्पिटलने दाखल करून घेतले मात्र कामगाराच्या नातलगांकडे अनामत रक्कम भरण्यास सांगितले. त्यामुळे एका हाॅस्पिटलमधून दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये जखमी कामगारास पाठवून त्याची हेळसांड करण्यात आली. अखेर रात्री ११ वाजता मुंबईनाका येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले.

इएसआय हाॅस्पिटलच्या तक्रारी कायम
इएसआय रूग्णालयाच्या गलथान कारभाराबाबत रूग्णांच्या कायम तक्रारी असल्याने दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास माेरे यांनी मुंबईतील वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्या हाेत्या. त्यामुळे रूग्णालयात जानेवारी २०२० मध्ये प्रथमच लाेक अदालत आयाेजित करण्यात आली हाेती. यात शेकडाे रूग्णांनी तक्रारी दाखल केल्याने तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांना पदमुक्त करण्यात आले हाेते. आता पुन्हा त्यांच्याच हातात सुत्रे आहेत.

प्लास्टीक सर्जरी करणारे सर्जन नाही
इएसआय हाॅस्पिटलमध्ये प्लास्टीक सर्जरी करणारे सर्जन नाहीत. त्यामुळे ज्या रूग्णांना प्लास्टीक सर्जरीची गरज असते, अशा रूग्णांना आमचा करार असलेल्या हाॅस्पिटलमध्ये पाठवले जाते. मात्र त्यांची बिले बाकी असल्याने ते उपचार करत नसल्याची बाब आमच्या अखत्यारीत नाही.
– डाॅ. सराेज जवादे, वैद्यकीय अधीक्षक इएसआय हाॅस्पिटल

डाॅक्टरांची वागणूक याेग्य नाही
कामगारांच्या दृष्टीने इएसआय रूग्णालय महत्वाचा घटक आहे. मात्र रूग्णालयातील डाॅक्टरांची वागणूक याेग्य नाही. अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते हे दुर्देव आहे. आमच्या तक्रारीमुळे रूग्णालय प्रशासनाविराेधात लाेकअदालत घेण्यात आली. मात्र अद्यापही कुठलीच सुधारणा दिसून येत नाही ही माेठी शाेकांतिका आहे.
– धनंजय बेळे, अध्यक्ष निमा

समन्वयाचा अभाव
रुग्णालय प्रशासन व कर्मचारी विमा महामंडळ अधिकारी या दाेघांमध्येही समन्वय नाही. त्यामुळे रूग्णालयातील रुग्णसेवेचा पुरता बाेजवारा उडालेला आहे. रुग्णांशी अरेरावी केली जाते. वैद्यकीय अधीक्षकांकडून मिळणारी उत्तरे अनाकलनीय असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी