31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यउपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा 

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा 

महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर भारतातील लोकही या दिवशी उपवास करतात. या दिवशी पहाटेपासून गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी घरामध्ये गणपतीची मूर्ती स्थापित केल्याने संपूर्ण वर्षभर समृद्धी प्राप्त होते.(Eat Fruits To Stay Energetic in Fast)

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले सर्वांचे लाडके बाप्पाचे आगमन होणार. भारत ऐवजी जगाच्या अनेक देशात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर भारतातील लोकही या दिवशी उपवास करतात. या दिवशी पहाटेपासून गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी घरामध्ये गणपतीची मूर्ती स्थापित केल्याने संपूर्ण वर्षभर समृद्धी प्राप्त होते.(Eat Fruits To Stay Energetic in Fast)

चमकदार त्वचा हवी? मग आजच आपल्या आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

विशेषत: महिला या दिवशी उपवास करतात. परंतु, काही महिलांना उपवासाच्या वेळी थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. ही एक सामान्य समस्या आहे, जी बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. अशा परिस्थितीत तुम्ही काही फळांचे सेवन करू शकता. फळांमध्ये नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. उपवासात फळांचे सेवन केल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि तुमचा थकवाही दूर होतो.  तर आम्ही आज तुम्हाला अशाच फळांबद्दल सांगणार आहोत. (Eat Fruits To Stay Energetic in Fast)

केळी
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. उपवासाच्या वेळी तुम्ही केळीचे सेवन करू शकता. पोटॅशियम हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे, जे स्नायूंना ऊर्जा प्रदान करते. उपवास करताना येणारा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही सकाळी केळीचे सेवन करू शकता. (Eat Fruits To Stay Energetic in Fast)

टोमॅटोपासून बनवा फेस पॅक, चेहऱ्यावरील डाग करा दूर

सफरचंद
जे पहिल्यांदा उपवास करतात आणि काही लोकांना उपवासाच्या वेळी पुन्हा पुन्हा भूक लागते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही सफरचंदाचे सेवन करू शकता. सफरचंदात उच्च फायबर आढळते. फायबरमुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. सफरचंदमध्ये नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवतात. (Eat Fruits To Stay Energetic in Fast)

डाळिंब
डाळिंब हे बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. डाळिंबातील जीवनसत्त्वे आणि खनिजे तुमच्या शरीराच्या रोजच्या गरजा पूर्ण करतात. यामुळे थकवा दूर होतो आणि उपवासात पचनाच्या समस्या येत नाहीत. उपवासाच्या वेळी तुम्ही डाळिंबाचा रस देखील पिऊ शकता. (Eat Fruits To Stay Energetic in Fast)

संत्रा
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. उपवासात झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. उपवासात संत्र्याचा रस प्यायल्याने तुमची नैसर्गिक साखरेची पातळी नियंत्रणात राहते. (Eat Fruits To Stay Energetic in Fast)

द्राक्ष
द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे, उपवास करताना तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या भेडसावत नाही. हे तुमचे चयापचय मजबूत करते. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. याचे सेवन केल्याने तुम्हाला अशक्तपणा जाणवत नाही आणि तुम्हाला दिवसभर बरे वाटते. (Eat Fruits To Stay Energetic in Fast)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी