32 C
Mumbai
Monday, March 25, 2024
Homeआरोग्यGood Health : निरामय आरोग्यासाठी ‘लिंबू’ खाणे हितकारक

Good Health : निरामय आरोग्यासाठी ‘लिंबू’ खाणे हितकारक

निरामय आरोग्यासाठी (good health) दररोज एक तरी फळ खाणे आवश्यक असते. परंतु धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही.

निरामय आरोग्यासाठी (good health) दररोज एक तरी फळ खाणे आवश्यक असते. परंतु धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही. शिवाय बाजारात अनेक वेळा फळं महाग असतात. त्यामुळे खिशाला परवडत नाहीत. अनेक वेळा फळांचा दर्जा चांगला नसतो. त्यामुळे ती घ्यावीशी वाटत नाही. शिवाय फळ हे नाशिवंत असल्याने अनेक दिवस टिकत नाही. अशा अनेक कारणांमुळे फळं घेण्यास आपण मागेपुढे करतो. परंतु फळ हे निरामय आरोग्यासाठी ह‍ितकार आहे. आपल्याकडे एक असे फळ आहे की, ते वर्षाच्या बारा महिने उपलब्ध असते. आपल्या फ्रीजमध्ये हमखास सापडते. ते फळ म्हणजे ‘लिंबू’ होय.

‘लिंबू’ हे हजारात एक फळ आहे. ते उत्तम आरोग्याची फळं आपल्याला देते. लिंबाचे असंख्य फायदे आहेत. शिवाय हे फळ लवकर खराब होत नाही. शिवाय महाग देखील नसते. त्यामुळे नेहमीच्या आहात लिंबाचा वापर करणे गरजे आहे. आपल्याला थकवा आला तर आपण लिंबाचा रस पिऊ शकतो. खूप झोप येत असेल तर चहा कॉफी ऐवजी लिंबूचे सरबत प्यावे खुपच ताजेतवाने वाटते. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे ते देखील लिंबू रसाचे सेवन करु शकतात. लिंबूचा रस हा दोन्ही प्रकारच्या रक्तादाबावर रामबाण उपाय आहे.

दोन्ही प्रकारचे रक्तदाब म्हणजे ‘हाय बीपी ’ आणि ‘लोबीपी’ . दोन्ही प्रकारच्या रुग्णांनी अत्यंत इर्मजन्सीमध्ये एक ग्लास लिंबूचे सरबत प्यावे. यामध्ये लो बीपीची समस्या असल्याच चिमुट भर मीठ टाकावे. बऱ्यापैकी साखर टाकावी. तसेच जर हाय बीपीची समस्या असेल तर मीठ न टाकता चिमुट भर साखर टाकावी आणि सरबत प्यावे. थोडयाच वेळात ताकद येते म्हणजेच ताजेतवाने वाटते. अपचन झाल्यास मेडीकल मधील गोळया खाण्यापेक्षा एक ग्लास लिंबूचे सरबत प्यावे. त्रास हळू हळू कमी होतो. पोट फुगले, पोट दुखत असल्यास, डोके दुखत असल्यास, पायात मुंग्या येणे, पोटऱ्यांना पेटगे येणे अशा समस्या असल्यास लिंबूच्या रसाचे सेवन करावे. कोणत्याही प्रकारच्या पित्तामध्ये लिंबूचे सरबत आपण पिऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का, जयंत पाटलांचा कडवा सवाल

University : महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीच्या अध‍िकाऱ्यांची घेणार शाळा !

मांसाहारी लोकांनी ‘लिंबू’ खाणे अत्यंत गरजेचे असते. कारण मांसाहारामधील सर्वच पदार्थ हे पचण्यासाठी जड असतात. ‘लिंबू’ हे एक उत्तम पाचक आहे. तुम्हाला इनो सारखे पदार्थ प्यावे लागणार नाही. मात्र आपण अधुनिकतेच्या नावाखाली या गोष्टींकडे लक्ष देत नाही. थोडया थोडक्या कारणांसाठी रुग्णालयांकडे धाव घेतो. विज्ञान युगात देखील आपण आपल्या घरातील आजीबाईचा बटवा उघडला पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी थोडे किचनमध्ये देखील डोकावून पाहिले पाहिजे. कारण आपल्या किचनमध्ये उत्तम आरोग्याचा मेवा आपल्याला हमखास सापडतो. हा ठेवा कोणत्याही महागडया शितपेया पेक्षा नक्कीच खिशाल परवडणारा असून. आरोग्यदायी देखील आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी