30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरआरोग्यEye operation : अबब ! डोळ्यातून ऑपरेशन करून काढला चक्क चाकू !

Eye operation : अबब ! डोळ्यातून ऑपरेशन करून काढला चक्क चाकू !

शस्त्रक्रिया करून डोळ्यातून चक्क सहा इंची चाकू काढण्याची किमया डॉक्टरांनी केली आहे. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी हे अवघड काम यशस्वी करून दाखविले आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे जनमाणसांमधून अभिनंद व कौतुक करण्यात येत आहे.

डोळा हा अत्यंत नाजूक अवयव आहे. या अवयवावर शस्त्रक्रियेचे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा उभा राहतो. परंतु शस्त्रक्रिया (Eye Operation) करून डोळ्यातून चक्क सहा इंची चाकू काढण्याची किमया डॉक्टरांनी केली आहे. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी हे अवघड काम यशस्वी करून दाखविले आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे जनमाणसांमधून अभिनंद व कौतुक करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील ४० वर्षाच्या विलन सोमा भिलावे या रूग्णाच्या डोळ्यातून चाकू काढण्याचे मोठे काम डॉक्टरांनी केले. त्यामुळे या रूग्णाचा जीव वाचला आहे.

अशी झाली शस्त्रक्रिया

विलन सोमा भिलावे यांच्या डोळ्यात सहा इंची धातूची पट्टी गेली होती. त्यामुळे त्यांना तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतले. त्यानुसार त्यांनी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं.
मध्यरात्री साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास विलन सोमा भिलावे यांना त्यांच्या नातेवाईकांनी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. रात्रीच रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील सर्व डॉक्टरांची मिटिंग झाली. त्यात त्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याविषयीचे नियोजन करण्यात आले. लागलीच पहाटेच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली.

तत्पूर्वी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांनी नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. मुकर्रम खान यांच्यावर उपचाराची जबाबदारी सोपवली. संबंधित रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश संबंधितांनी दिले.

डॉ. मुकर्रम खान यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली असता त्या रुग्णाच्या डोळ्यात खोलवर धातूची पट्टी गेल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं. डोळ्यात धातूची पट्टी गेलेली असल्यानं रुग्णाला असहाय्य वेदना, त्रास होत होता. त्याला कमी दिसत होते. शिवाय या धातूच्या पट्टीने रुग्णाच्या कान, नाक, घशालाही इजा झालेली असण्याची भीती डॉक्टरांना होती. अशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचं मोठं आव्हान डॉक्टरांपुढे होतं. मात्र सर्व परिस्थितीचा विचार करून डॉ. मुकर्रम खान यांनी कान, नाक, घसा याच्याशी संबंधित डॉक्टरांना देखील बोलावले.मध्यरात्री साधारण अडीचच्या सुमारास रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णावर रात्रीच सर्व नियोजन करून पहाटेच्या वेळी ही गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया सुरु झाली.

डॉक्टर आणि टीमवर अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव

संबंधित रुग्णाच्या डोळ्यातून धातूची पट्टी काढत असतांना शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह त्यांच्या टीमला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. ती धातूची पट्टी नाही तर चक्क ६ इंचाचा चाकू असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. गुंतागुंतीची ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. मुकर्रम खान आणि त्यांच्या टीमने मोठ्या धैर्याने, आत्मविश्वासानं यशस्वी केली अन संबंधित रुग्णाला जीवदान दिले.रुग्णाला जीवदान देण्याऱ्या डॉक्टरांचे, शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमवर केवळ रुग्णाच्या नातेवाईकांनीच नव्हे तर रुग्णालयातील उपस्थितांनी देखील अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सरकारी रुग्णालयात देखील चांगली, तत्पर सेवा मिळते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर देखील रुग्णसेवेसाठी तत्पर असतात, सरकारी रुग्णालयांप्रती विश्वास आजही टिकून आहे. हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र सरकारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण त्याच्या नातेवाईकांनी देखील सरकारी रुग्णालयातील नियमांचे पालन करून डॉक्टरांना, स्टाफला सहकार्य करायला हवे. त्यांना समजून घ्यायला हवे, सरकारी रुग्णालयात स्वच्छता पाळायला हवी, एवढीच माफक अपेक्षा डॉक्टर्स आणि स्टाफने व्यक्त केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी