31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeआरोग्यFever : तापाची साथ आल्यामुळे पाँडेचेरीमधील शाळा आठ दिवस बंद राहणार

Fever : तापाची साथ आल्यामुळे पाँडेचेरीमधील शाळा आठ दिवस बंद राहणार

पाँडेचेरी हे भारतातील सात केंद्रशास‍ित प्रदेशांपैकी एक आहे. या पाँडेचेरीमध्ये मुलांना आचानक ताप (Fever) येऊ लागल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण‍ निर्माण झाले आहे.

पाँडेचेरी हे भारतातील सात केंद्रशास‍ित प्रदेशांपैकी एक आहे. या पाँडेचेरीमध्ये मुलांना आचानक ताप (Fever) येऊ लागल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण‍ निर्माण झाले आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी मोठया संख्येने आजारी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पाँडेचेरी आणि कराईकलमध्ये शेकडो मुले ताप, सर्दी आणि खोकल्याने आजारी पडत आहेत. सर्व आजारी मुलांना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत पाँडेचेरी आणि कराईकलमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आठवी पर्यंतच्या सगळयाच शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाँडेचेरीच्या आरोग्य विभागाने देखील या घटनेला पुष्टी दिली आहे.

पाँडेचेरी आणि कराईकलमध्ये एक आठवडयापासून विद्यार्थी तापाने फणफणत आहेत. रोज सुमारे 150 हून अधिक विद्यार्थी आजारी पडत आहेत. त्यामुळे पालकांना देखील काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील प्रमुख डाँक्टर संथानाकृष्णन यांनी सांगितले की, फ्लू म्हणजेच संसर्गजन्य तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे मुलांना संसर्ग होत आहे. शाळा बंद ठेवणे हाच एक उपाय असून, संसर्ग वाढणार नाही याची काळजी रुग्णालय प्रशासन घेत आहे. कोरोना काळा प्रमाणे मास्क तसेच सॅनिटायजरचा वापर करणे तसेच नियमीत हात धुण्याचे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे.

हे सुद्धा वाचा

Chandigarh University : धक्कादायक बातमी ! चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल मीडियावर केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

MNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा नारळ फोडला

Eknath Shinde Promise : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा भागात विकासकामांना गति देण्याचे आश्वासन दिले

देश नुकताच कोरोना महामारीतून सावरत आहे. साधारणपणे 6 महिन्यांपासून जिवनक्रम सुरळीत सुरू झाला आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा या वर्षी जून महिन्यात वेळेवर सुरू झाल्या आहेत. देशभरात कोरोना लसीकरण करण्यात आले, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश आले आहे. मात्र करोनाचा समुळ नायनाट झालेला नाही, अजूनही अनेक ठिकाणी हजारो रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी