34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यगिरीश महाजनांची मोहीम, आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या संख्येने राबविणार !

गिरीश महाजनांची मोहीम, आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या संख्येने राबविणार !

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यभरात विविध लोकाभिमुख अभियान राबवण्या संदर्भात नियोजन करण्यासाठी काल (9 फेब्रुवारी) वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची कार्यशाळेचे राष्ट्रीय क्रीडा सदन, वरळी येथे आयोजन केले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या अभियानात राज्यभरातील सर्व शासकीय खाजगी वैद्यकीय दंत आयुष होमिओपॅथी, फिजिओथेरपी व नर्सिंग महाविद्यालय दरम्यान राबवण्याबाबत व प्रभावी अंमलबजावणी करणे संदर्भात सूचना देखील दिल्या आहेत.

राज्यातील सर्व शासकीय, खाजगी व अभिमत वैद्यकिय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता तसेच राज्यातील विविध परिषदेचे अध्यक्ष व प्रबंधक यावेळी उपस्थित होते. या अभियानातून राज्यस्तरावर सक्षम प्रचार प्रसार करण्याकरिता राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील प्रतिनिधी कार्यशाळेत उपस्थित होते. (Girish Mahajan’s campaign, health activities will be implemented in large numbers!)

शासनाद्वारे घोषित करण्यात आलेल्या अभियानामध्ये स्तन कर्करोग जनजागृती अभियान, अवयव दान अभियान, रक्तदान अभियान, मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान, लठ्ठपणा जनजागृती अभियान, थायरॉईड व ऑस्टिपोरोसिस अभियान, ओरल हेल्थ मिशन अश्या आठ अभियानाचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे या अभियानाद्वारे त्या त्या विषयांच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल याकरिता विविध उपक्रम राबवण्याचे सूचना केल्या व हे सर्व अभियान त्वरित सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत. यानुसार येत्या 19 फेब्रुवारी रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती नामदार महाजन यांनी यावेळी दिली.

याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, अश्विनी जोशी वैद्यकीय शिक्षण विभाग व औषधी द्रव्ये विभाग, राजीव निवतकर आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, संचालक आयुष डॉक्टर रेड्डी, टाटा हॉस्पिटलचे डॉ. कैलाश शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह सचिव, उपसचिव उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : गिरीश महाजनांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नावाने भव्य स्पर्धा

गिरीश महाजनांनी तृतीयपंथियांसाठी उचलले मोठे पाऊल

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत मंत्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात अवयव दान अभियान, स्तन कर्करोग जनजागृती, लठ्ठपणा जनजागृती अभियान राबविण्यात आले होते व या माध्यमातून या विषयाचे जनजागृती मोहीम राबवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. याच धर्तीवर पुन्हा मोठ्या प्रमाणात विविध लोकाभिमुख व समाज जागृतीच्या विषयासंदर्भातील हे अभियान येत्या कालावधीत राबविण्यात असून याकरिता विविध अभियानासाठी समाजातील मान्यवरांचे ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी