27 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरआरोग्यराज्यात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत सर्वात जास्त रुग्ण !

राज्यात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत सर्वात जास्त रुग्ण !

महाराष्ट्रात सध्या गोवरच्या आजाराने थैमान घातले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या गोवरबाधितांची संख्या 745 वर पोहोचली आहे. शिवाय संपूर्ण राज्यात 12 हजार 241 इतक्या मोठ्या संख्याने गोवरचे संशयित रुग्ण आहेत. आत्तापर्यंत गोवरच्या आजाराने 18 मुलांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सध्या गोवरच्या आजाराने थैमान घातले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या गोवरबाधितांची संख्या 745 वर पोहोचली आहे. शिवाय संपूर्ण राज्यात 12 हजार 241 इतक्या मोठ्या संख्याने गोवरचे संशयित रुग्ण आहेत. आत्तापर्यंत गोवरच्या आजाराने 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर अधिकचा भार आला असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि गोवरपासून त्यांचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राजधानी मुंबईतदेखील गोवरचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील गोवंजडी परिसरात गोवरचा पहिला मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, मालाड, भांडुप याी परिसरात गोवरचा प्रसार झाला असून मालेगाव मनपा, भिवंडी मनपा, ठाणे मनपा, ठाणे जिल्हा, वसई-विरार मनपा, मिरा भाईंदर मनपा, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा, औरंगाबाद मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, बुलढाणा व राजगड यांसारख्या राज्यातील महानगरांमध्येही गोवरचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यभरात मृत पावलेल्या 18 पैकी 12 मुले ही एकट्या मुंबईतील असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढल्याचे चित्र दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

7 सिक्स मारताना ‘युवी’च्या नावाचा जप करत होतो, ऋतुराजने केला खुलासा

धारावी प्रकल्प हाती घेणे अदाणींचा अडाणीपणा ?

बांग्लादेश दौऱ्याची लगबग सुरू; 4 डिसेंबरला रंगणार पहिला सामना

गुरुवारी (1 डिसेंबर) समोर आलेल्या अहवालानुसार मुंबईत दिवसभरात एकुण 23 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या मुंबईत 3 रुग्णांची स्थिती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेरटवर ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पालिकेने दिलेल्या अहवालानुसार गुरुवारी दिवसभरात 45 रुग्णांना पालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 30 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.

गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स
गोवरचा प्रादूर्भाव हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच राज्यसरकारने आता 11 तज्ज्ञ डॉक्टरांना समाविष्ट करत राज्यस्तरीय टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. राज्याचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात मुंबईत गोवरचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून आले त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, अकोला, ठाणे, भिवंडी व वसई विरार, रायगड, मालेगाव, संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड, बुलढाणा या जिल्ह्यातही गोवरचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता या टास्क फोर्सवर असणारे काम वाढले आहे. गोवरचा प्रादूर्भाव आटोक्यात आणण्याचे मोठे लक्ष्य या टास्क फोर्सच्या समोर असणार आहे.

टास्क फोर्सचे सदस्य
बाल रोग तज्ज्ञ डॉ. आरती किणीकर व डॉ. प्रमोद जोग, आरोग्य सेवेचे माजी संचालक पी.एस. डोके, संचालक डॉ. अब्राहम, साथरोग सहाय्यक संचालक डॉ. प्रदिप आवटे, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे, डॉ. यशवंत आमडेकर व डॉ. नितीन आंबाडेकर,

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!