28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यखजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा व्हावा,यासाठी आहारतज्ज्ञ डाएटमध्ये खजुराचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये पोटॅशिअम आणि अँटी -ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं त्यामुळेच खजूर खाण्याचे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा व्हावा,यासाठी आहारतज्ज्ञ डाएटमध्ये खजुराचा (Dates) समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये पोटॅशिअम आणि अँटी -ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.खजूर (Dates) खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर (Dates) खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजूरातून (Dates) शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं त्यामुळेच खजूर (Dates) खाण्याचे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.(Health benefits of eating dates )

खजूर (Dates) खाण्याचे आरोग्यदायी फायदे-

पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक
खजुराच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते.कारण यामध्ये फायबरची मात्रा अधिक असते.खजुरातील पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

पचनक्रिया सुधारण्यास मदत
खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यास होतो. खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही.

वजन आटोक्यात ठेवणे
पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो. खजुरात फ्रक्टोज ही साखर असते. साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर आरोग्यदायी ठरतो. आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्यानं वजनही आटोक्यात राहातं.खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

कर्करोगाचा धोका कमी
खजुरातील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. सुकामेव्यात खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे
ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो.

नैसर्गिक प्र्सूती होण्यासाठी
गरोदरपणात नैसर्गिक प्र्सूती होण्यासाठी खजुर खाण्याचा फायदा होतो. तसेच प्रसूती काळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणाही खजुराचा आहारात समावेश केल्यानं दूर होतो.

हाडांचे आरोग्य राहते निरोगी
खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फाॅस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो. त्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहते .

त्वचा व केस गळती कमी
खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहाण्यास मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग होतो. खजुरात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. रोजच्या आहारात खजूर असल्यास ॲनेमियाचा धोका टळतो.

हृदयाचे आरोग्य
खजुरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. यातील खनिजांमुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडते आणि हृदयविकारांचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. कारण यामध्ये कोलेस्ट्रॉल व सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी