29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!

हिवाळ्यात होणाऱ्या केस गळतीवर काही साधे आणि सोप्पे घरगुती उपाय.

हिवाळ्यात केस गळण्याचे प्रमाण हे इतर ऋतू पेक्षा नेहमी जास्त असते. केसगळतीच्या समस्येवर वेळीच काळजी न घेतल्यास ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. जर तुमचे केस ही गळत असतील आणि तुम्ही काही घरगुती उपाय शोधत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करू शकतात. हे घरगुती उपाय काय आहेत आणि ते कसे वापरायचे ते जाणून घ्या…..

केसांना तेलाने मसाज करा

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!केसांना तेलाने मसाज करणे खूप महत्वाचे आहे. केसांना आणि टाळूला तेलाने व्यवस्थित मसाज केल्याने केसांच्या मुळांमध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, आणि यांमुळे केस गळणे हळूहळू कमी होऊ लागते.

आवळा देखील गुणकारी आहे

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!आरोग्यासोबतच केस गळतीच्या समस्या रोखण्यासाठी आवळा खूप गुणकारी आहे. हे केवळ केसांच्या वाढीस प्रोत्साहन देत नाही तर केस मजबूत देखील करते. यासाठी आवळा पावडरमध्ये शिककाई आणि रेठा घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. यानंतर केस पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

मेथी दाणा सुद्धा प्रभावी

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!केसगळती नियंत्रित करण्यासाठीही मेथी गुणकारी आहे. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. यासाठी रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मेथी दाणे बारीक करून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि खोबरेल तेल घाला. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. ते कोरडे होईपर्यंत केसांवर ठेवा. यानंतर पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.

हे सुद्धा वाचा

PHOTO: हिवाळ्यासाठी तुप आहे सुपरफूड; हे आहेत आश्चर्यकारक फायदे

Winter Healthy Drinks: हिवाळ्यात सर्दीने केलंय त्रस्त; हे 7 प्रकारचे ज्यूस वाढवतात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती

PHOTO: हिवाळ्यात ‘या’ जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!

कोरफड देखील काम करते

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!कोरफड जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच ते केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. यासाठी कोरफडीची पाने मधोमध कापून त्याचा गीर काढा आणि केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. केसगळतीपासून काही दिवसांत आराम मिळेल.

कांद्याचा रस ठेवतो केसगळतीवर नियंत्रित

हिवाळ्यात केसगळतीचा त्रास होतोय? मग हे उपाय कराच!केसगळती नियंत्रित करण्यासाठी कांद्याचा रस देखील प्रभावी आहे. यासाठी फक्त कांदा बारीक करून त्याचा रस काढा. ते केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी