आरोग्य

Lockdown : मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद, रेल्वेही बंद : उद्धव ठाकरे यांची घोषणा

‘कोरोना’ग्रस्त रूग्णांची संख्या ७५ वर गेल्यामुळे Lockdown चा निर्णय

 

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील ‘कोरोना’ग्रस्तांची ( Covid-19 ) संख्या ७५ वर पोचल्यानंतर आता राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद ( Lockdown )  होईल. त्यासाठी कलम १४४ लागू केले आहे. त्यानुसार ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबईतील उपनगरीय रेल्वे व मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील खासगी बसेस व इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयील उपस्थितीचे प्रमाणही ५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. एसटी, बेस्टसारख्या बसेस फक्त जीवनावश्यक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच चालू असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray announced lockdown for Maharashtra ) यांनी केली आहे.

राज्याबाहेर जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वे व खासगी बसेस बंद केल्या आहेत. सरकारी व खासगी बसेस राज्यातही बंद केल्या आहेत.  परदेशातून मुंबईत येणारी विमाने बंद केली आहेत. आरोग्य, वीज, पोलीस, बँका, सफाई कामगार असे अत्यावश्यक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी व बेस्ट बसेस चालू राहतील. होम कॉरन्टाईन केलेल्या ज्या लोकांच्या हातावर स्टॅम्प मारला असेल त्यांनी वेगळे राहायला हवे. त्यांनी बाहेर फिरू नये. घरात त्यांनी कुटुंबियांपासून वेगळे राहायला हवे. कुटुंबियांनी सुद्धा अशा आपल्या नातलंगाना १४ – १५ दिवस वेगळे ठेवण्याची मानसिक तयारी करावी, अशी सूचना ठाकरे यांनी केली आहे.

खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ( Work from home ) पद्धत लागू करा. शासकीय कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती पाच टक्क्यांवर आणत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी सुद्धा त्याचे पालन करावे. आरोग्य यंत्रणेमध्ये सुद्धा माणसं काम करीत आहेत. त्या माणसांवरील भार वाढवू नका. सिद्धीविनायक, शिर्डीचे साई मंदीर, पंढरपूरचे विठ्ठल मंदीर अशी अनेक देवस्थाने दर्शनासाठी बंद केली आहेत. उर्वरीत सगळी देवस्थाने सुद्धा बंद करा. मंदिर, चर्च, मशिदी बंद करा. आरती व प्रार्थनेपुरते संबंधित धर्मगुरू देवस्थानांमध्ये गेले तरी हरकत नाही. पण दर्शनासाठी ही देवस्थाने बंद करा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ट्रम्पपासून संरपंचापर्यंत सगळ्यांनाच या संकटाने ग्रासले आहे. त्यामुळे संकटाचा मुकाबला करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तळहातावर ज्यांचे पोट आहे त्यांची काळजी घ्यायला हवी. खासगी कंपन्यांनी कामगारांचे किमान वेतन द्यायला हवे. माणूसकी सोडू नका. शेतकरी, जवान, कामगार यांना जपले पाहीजे. जीवनाश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील. त्यामुळे जीवनाश्यक वस्तुंचा साठा करू नका असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

आपला सगळ्यात कठीण काळ सुरू झाला आहे. जगभरात ‘कोरोना’चा विषाणू गुणाकाराने वाढत आहे. त्याला वाढू देऊ नका. त्याची वजाबाकी करूया. त्यासाठी लोकांनी घरातच राहायला हवे. सगळ्यांचीच गैरसोय होतेय. दुरचित्रवाणीवरील देशाचे चित्र पाहवत नाही. पण ‘जान बची तो लाखो पाये’, हे ध्यानी घ्यायला हवे. ‘संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ही परिस्थिती ३१ मार्चपर्यंत नियंत्रणात आली नाही, तर त्यानंतरही लॉकडाऊनची ही मर्यादा वाढविली जाऊ शकेल असे सूत्रांनी सांगितले.

ऐरोलीमध्ये कोरोना रूग्ण आढळला

‘कोरोना’ग्रस्तांची देशातील संख्या ३४१, तर महाराष्ट्रात ७५ एवढी झाली आहे. आज ऐरोलीत १ रूग्ण आढळला आहे. हा रूग्ण तुर्कीवरून आला होता. देशात ७ जण मृत्यू झाले आहेत, तर महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : दुबई, अबुधाबी, हाँगकाँगहून परतलेल्या कांदिवलीच्या तीन कुटुंबांची शहरभर भटकंती

Coronavirus : ‘चलता है’ वृत्तीने नुकसान होईल : विश्वास नांगरे पाटील

Coronavirus : दहावीच्या उरलेल्या एका विषयाचीही परीक्षा लांबणीवर

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

20 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

21 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

22 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

22 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

22 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago