29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरआरोग्यसेंट जॉर्ज रुग्णालयाच्या ओपीडीत ७० टक्के रुग्ण घटले

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या ओपीडीत ७० टक्के रुग्ण घटले

कोविडच्या दोन वर्षानंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील ओपीडीत ७० टक्के रुग्ण घटले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ विभाग बंड असून शस्त्रक्रिया विभागाची दुरुस्ती सुरू असल्याने तातडीच्या व सोप्या शस्त्रक्रिया होत असून रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच कर्मचारी सह निवासी डॉक्टरांचा तुटवडा असल्याने येथील बंद पडलेले दोन विभाग कोविड नंतर सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत का, असा प्रश्न आमदार राजहंस सिंह यांनी केला. त्यावर मुश्रीफ यांनी हे उत्तर दिले.

कोविड नंतर दोन वर्षानंतर ओपीडीत ७० टक्क्यानी रुग्ण घटल्याचे तसेच उपचार करण्यासाठी आलेल्या पेशंटला जे.जे. हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुचविण्यात येत आहे, हे अंशतः खरे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी कबूल केले आहे.

हे सुद्धा वाचा

उदय सामंतांनी मांडले विधेयक, उद्योगवाढीसाठी खमके धोरण !

मुंबईत 22,483 कुटूंबे धोकादायक स्थितीत; 12 वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांवर उपाययोजना नाही

धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांसाठी आणला भन्नाट उपक्रम !  

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी