31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
घरआरोग्यसावधान, देशात पुन्हा एक नवीन व्हायरस; काळजी न घेतल्यास होऊ शकतो मृत्यू!

सावधान, देशात पुन्हा एक नवीन व्हायरस; काळजी न घेतल्यास होऊ शकतो मृत्यू!

सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असे आजार आजिबात हलक्यात घेऊ नका; गेल्या आठवड्यात संपूर्ण देशात नव्या विषाणूचा संसर्ग 63 टक्क्यांनी वाढला आहे.

सावधान, देशात पुन्हा एक नवीन व्हायरस आला आहे. योग्य काळजी न घेतल्यास होऊ शकतो मृत्यू, असा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. (New Virus Threat) देशात सध्या हिवातापाच्या आजाराची तीव्र लाट सुरू आहे, अशातच या नव्या विषाणूचा धोका चिंता वाढविणारा आहे. कर्नाटकात 26 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्या तसेच वृद्ध रुग्णांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिला आहे. या व्हायरसच्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी ICMR ने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

कर्नाटकमधील 26 लोकांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याची आरोग्यमंत्री डॉ.के.के. सुधाकर यांनी पुष्टी केली आहे.
यापैकी दोन प्रकरणे बेंगळुरूमधील आहेत. 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या नव्या व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक आहे. 60 वर्षांहून जास्त वयाच्या मंडळींनाही हा विषाणू संक्रमित करत असल्याचे डॉ. सुधाकर यांनी म्हटले आहे. गर्भवती महिलांनीही या विषाणूपासून सावध राहण्याची गरज आहे. या नव्या विषाणूचा संसर्ग फक्त कर्नाटकच नाही तर संपूर्ण देशभरात कोविड आणि या नव्या व्हायरसच्या प्रकरणात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण देशात नव्या विषाणूचा संसर्ग 63 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ धास्तावले आहेत.

काय आहे नवीन व्हायरस H3N2v?

आयसीएमआरने हा नवीन व्हायरस H3N2v म्हणजे सर्दीजन्य आजार पसरवणाऱ्या इन्फ्लूएंझा ए विषाणूचाच उपप्रकार असल्याचे म्हटले आहे. सध्या देशभरात ताप आणि थंडीची लाट आली आहे, ती पसरण्यामागचे मूळ कारण म्हणजे हाच H3N2 विषाणू आहे. अमेरिकी रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच यूएस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (CDC) अनुसार, H3N2v हा मुख्यत: डुकरांमध्ये आढळणारा व्हायरस आहे. सामान्यतः डुकरांमध्ये पसरणारा इन्फ्लूएन्झा ए विषाणू जेव्हा माणसात आढळतो तेव्हा इन्फ्लूएन्झाच्या त्या व्हेरिएंट व्हायरसला H3N2v म्हणून ओळखले जाते. या व्हायरसने मानवांमध्ये महामारी निर्माण केल्याचे पहिल्यांदाजुलै 2011 मध्ये आढळून आले. हा विषाणू 2010 मध्ये अमेरिकेत डुकरांमध्ये सापडला होता. त्यानंतर 2012 मध्ये अमेरिकेत अनेक ठिकाणी H3N2vचे उद्रेक मनुष्यात नोंदवले गेले.

H3N2vची लक्षणे

CDC नुसार, H3N2v संसर्गाची लक्षणे हंगामी फ्लूच्या विषाणूंसारखीच असतात. यामध्ये ताप, श्वासोच्छवासाच्या समस्या, जसे की खोकला आणि वाहणारे नाक, आणि शक्यतो शरीर दुखणे, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यांसारखी लक्षणे असू शकतात.

आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

कोविड साथ आटोक्यात आल्यानंतर, गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाटकातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मास्क घातलेला नव्हता. मात्र, आता रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. H3N2 विषाणू दरवर्षी या काळात बदलतो आणि थेंबांद्वारे पसरतो, असे इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन, रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे संचालक आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

हेसुद्धा वाचा : 

कोविड साथीमागे बिल गेट्स? अखेर आरोपांवर बिलभाईंनी प्रथमच सोडले मौन; जाणून घ्या काय म्हणाले गेट्स …

Shivsena Crisis : आणखी दोन शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

धक्कादायक : कोविडमुळे म्हातारा होतोय मानवी मेंदू; याशिवाय होताहेत ‘हे’ गंभीर परिणाम

ताप, अंगदुखी असल्यास काळजी घ्या

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून H3N2 हा विषाणू पसरत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ज्ञांच्या मते, यामुळे जास्त लोक सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. या व्हायरसच्या संसर्गामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. काही प्रकरणात मृत्यू देखील होऊ शकतो. ICMR ने प्रतिबंधासाठी मास्क घालणे, पुरेसे द्रव पिणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळणे यासारख्या सोप्या उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. ताप आणि तीव्र अंगदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

New Virus Threat, Influenza Variant H3N2v, Flu Cases Rising, Post Covid Wave Care Treatment, ICMR GuideLines

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी