33 C
Mumbai
Saturday, September 30, 2023
घरआरोग्यआता राज्यात सर्व सरकारी रुग्णालयात मिळणार मोफत उपचार; मंत्रिमंडळाचा ...

आता राज्यात सर्व सरकारी रुग्णालयात मिळणार मोफत उपचार; मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे उद्या संपणार आहे. मात्र, हे अधिवेशन संपण्यापूर्वी शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मिळाला मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी यासाठी पाठपुराव्याला केला होता, त्यास आता मोठे यश मिळाले आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम १ नुसार आरोग्याचा हक्क नागरिकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार आरोग्य मंत्री सावंत यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांकडे लावून धरला होता.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय ( नाशिक आणि अमरावती या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत आरोग्य संरक्षण 5 लाखापर्यंत करण्याची घोषणा 28 जून 2023 रोजी केली होती. तसेच या योजनेचा आता सगळ्यांना फायदा घेत येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही आर्थिक दुर्बल घटकात असलेल्या गरीब लोकांवर उपचार करण्यासाठी कॉंग्रेस काळात बनवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा 
मुंबईत वयोवृद्ध व्यक्तीची सुरक्षा वाऱ्यावर; बोरिवलीतील आढळला वृद्धेचा कुजलेला मृतदेह
प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवा- जयंत पाटील यांची मागणी
रानकवी ना. धों. महानोर यांचे निधन

आता या योजनेचा लाभ कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात. तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरीसुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना महागडे उपचार घेणे परवडत नाही अशा गरीब लोकांसाठी शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण थेरेपीसारख्या महागड्या आरोग्य सेवासुद्धा या योजनेअंतर्गत पुरवल्या जात होत्या. या योजनेतील अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पूर्वी पात्र होते. पण सरकारने आता सगळ्याच वर्गासाठी ही योजना आणलेली आहे. पंतप्रधान आरोग्य योजनेत हा योजनेचा समावेशही करण्यात आलेला आहे. असे असताना आता राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे.त्यामुळे उपचाराविना रुग्ण दगावला हे रडगाणे आता बंद होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी