27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeआरोग्यOMG : अरे देवा! १० पैकी एकाला कोरोनाचा संसर्ग

OMG : अरे देवा! १० पैकी एकाला कोरोनाचा संसर्ग

टीम लय भारी

जिनिव्हा : जगभरातील १० पैकी एका व्यक्‍तीला (OMG) कोरोना विषाणूची लागण झाली असावी, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. (Oh my god, Corona infection in one in 10 people have been infected, according to the World Health Organization) कोविड-१९ संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये डॉ. मायकेल रेयान यांनी हा अंदाज वर्तवला.

ही संख्या ग्रामीण ते शहरी पातळीवर वेगवेगळी असू शकते. मात्र जगातील बहुतेक लोकसंख्येला या विषाणूचा धोका असल्याचेच यातून सिद्ध होते असेच चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याची जगाची लोकसंख्या ७.६ अब्ज इतकी आहे. त्यापैकी ७६० दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. लागण झालेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या तेवढीच आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या रुग्णसंख्येमध्येही हीच आकडेवारी पुढे आली आहे, असे डॉ. रेयान म्हणाले. आता जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्‍यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी