31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeआरोग्यआता घरबसल्या करा पेडीक्योर, काही मिनिटांतच सुंदर दिसतील पाय 

आता घरबसल्या करा पेडीक्योर, काही मिनिटांतच सुंदर दिसतील पाय 

बरेच लोक त्यांच्या त्वचेची खूप काळजी घेतात परंतु त्यांच्या पायांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात. पण आपल्या चेहऱ्यासोबतच पायांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (pedicure at home)

आजकाल कोणाला सुंदर दिसायची इच्छा नसते. स्त्री असो की पुरुष सुंदर दिसण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करतात. कोणी महागडे क्रिम वापरतात. तर कोणी मोठं-मोठ्या पार्लरमध्ये जाऊन आपल्या त्वचेला सुंदर बनविण्याचा प्रयत्न करतात. (pedicure at home)

तांदळाच्या पाण्याने मजबूत आणि मुलायम होतील केस

चेहरा हा माणसाचा आरास मानला जातो. मात्र, चेहराच नव्हे तर हाथ व पाय देखील सुंदर असले कि माणसाचा आत्मविश्वास अजूनच वाढतो. बरेच लोक त्यांच्या त्वचेची खूप काळजी घेतात परंतु त्यांच्या पायांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात. पण आपल्या चेहऱ्यासोबतच पायांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (pedicure at home)

पायांच्या काळजीसाठी पेडीक्योर केले जाते परंतु ही एक महाग प्रक्रिया आहे जी प्रत्येकाला परवडत नाही. अशा परिस्थितीत स्त्रिया अनेकदा त्यांच्या पायाच्या काळजीकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे त्यांचे पाय आणखीच कुरूप आणि काळे दिसू लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरीच तुमच्या पायांची काळजी घेऊ शकता? असं असलं तरी, पार्लरमध्ये जाऊन रसायनांनी भरलेल्या गोष्टींचा वापर केल्याने आपल्या त्वचेलाच नुकसान होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिक बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे घरबसल्या तुमचे पाय खूप सुंदर दिसतील. (pedicure at home)

आरोग्यासाठी फायदेशीर चिया बिया आणि काळ्या मनुकाचे पाणी

पेडीक्योर साठी साहित्य
अर्धा टब कोमट पाणी,
2 चमचे समुद्री मीठ,
1 लिंबू,
1 पॅकेट शॅम्पू,
र्धा चमचा हळद,
नेल कटर.

पेडीक्योर कसे करावे?
घरी पेडीक्योर करण्यासाठी, प्रथम आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवा. आता टबमध्ये अर्धा टब कोमट पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे समुद्री मीठ, कोणत्याही शॅम्पूचे 1 पॅकेट आणि अर्धा चमचा हळद घाला. आता या पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. आता त्यात तुमचा पाय टाका आणि 10 मिनिटे पाय ठेवा. 10 मिनिटांनंतर, टबमधून पाय बाहेर काढा आणि अर्धा लिंबू आपल्या पायावर चोळा. नियमितपणे लिंबाच्या सालीने पाय स्वच्छ करत रहा. (pedicure at home)

आता यानंतर, पुन्हा एकदा अर्धा टब कोमट पाण्यात पाय टाका आणि ब्रशच्या मदतीने टाचांची मृत त्वचा काढून टाका. जेव्हा मृत त्वचा पूर्णपणे काढून टाकली जाते, तेव्हा आपले पाय पुन्हा एकदा कोमट पाण्याने धुवा आणि नंतर नेल कटरने नखे कापून तुमचा आवडता नेल पेंट लावा. तुमचे सुंदर पाय पहा जसे तुमचे पेडीक्योर झाले आहे. ( pedicure at home)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी