आरोग्य

Coronavirus : मुंबईत १०, पुण्यात १ रूग्ण आढळला; कोरोनाग्रस्तांची संख्या ६३

बहुतांश Coronavirus रूग्ण परदेशातून आल्याचे राजेश टोपे यांची माहिती

 

टीम लय भारी

मुंबई :  राज्यातील ‘कोरोना’ग्रस्तांची ( Coronovirus ) राज्यातील संख्या वाढतच चालली आहे. आज मुंबईत तब्बल १०, तर पुण्यात एक नवीन रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६३ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी पत्रकारांना दिली.

मुंबईतील १० रुग्णांपैकी ८ जण परदेशातून आलेले आहेत. उरलेले दोघेजण व पुण्यातील एकजण अशा तिघांना संसर्गातून ‘कोरोना’ झाला आहे. एकूण ६३ रूग्णांपैकी १२ ते १४ जणांना संसर्गातून ‘कोरोना’ची लागण झाली आहे. अन्य रूग्ण परदेशांतून आले आहेत, असे टोपे यांनी सांगितले. संशयितांची तपासणी करण्यासाठी राज्यात सध्या ७ प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या असल्याचेही ते म्हणाले.

लोकांनी आता घराबाहेर पडू नका. घरात एसीचा प्रवास टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आवाहन

सध्या कोरोना विषाणूची रोकथाम करण्यासाठी व या विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. शासन निर्णयाद्वारे ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनामार्फत कळवण्यात आल्या आहेत. सर्वांनी घरीच थांबून या रोगाचा संभाव्य प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अतिआवश्यक सेवा वगळता इतर सर्व कामे थांबविण्यात आली आहेत.

मात्र असे असतांनासुद्धा होम क्वारंटाईन केलेले काही लोक सर्रास घराबाहेर पडून या प्रतिबंधाना हरताळ फासत असल्याचे दृष्टीस पडते आहे. या करिता सर्व नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

1. आपणास होम क्वारंटाईन केलेली कोणीही व्यक्ती अशा प्रकारे प्रतिबंध असतांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची माहिती ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांचे मार्फत पोलिसांना द्यावी

2. नागरी भागात नारपालिका मुख्याधिकारी यांनी अशा होम क्वारंटाईन च्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे व अशा प्रकारे प्रतिबंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांना माहिती द्यावी व कारवाई करावी

3. लग्नसमारंभ आणि इतर सोहळे यापासून लोकं दूर राहत असले तरी अंतिम संस्कार व रक्षा विसर्जन अशा कार्यक्रमांना करण्यास गर्दी करत आहेत असे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी सुद्धा संयम बाळगून व परिस्थिती चा विचार करून गर्दी टाळावी व कमीत कमी संख्येत हा संस्कार पाळावा.

4. हा आठवडा व यापुढील काही दिवस हे अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याने आपण या प्रतिबंधात्मक सूचनांचे कठोरपणे पालन करावे

उपरोक्त चतुसूत्री आपल्या भल्यासाठी असून. कोरोना संदर्भातील आपल्या या युद्धास आपण सहकार्य करून आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी बंधने पाळावीत असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

Aditya Thackeray यांनी शाहरूख खानचे मानले आभार

उद्धव ठाकरेंची दुपारी घोषणा, संध्याकाळी आदेश जारी

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago