24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यपावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या  

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या  

हवामानातील बदलामुळे तुम्हालाही त्वचेच्या अशा समस्या होत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. (skin problem after monsoon Beauty Tips)

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरावर देखील फरक जाणवतो. इतकंच नाही तर आपली त्वचा देखील हा हवामानाचा बदलता स्वरूप सहन करू शकत नाही. त्यामुळे त्वचेशी संबंधी समस्या सुरु होतात.  (skin problem after monsoon Beauty Tips)

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

पावसाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान ही वेळ कोरडी त्वचा, सोरायसिस आणि त्वचेवर अडथळे यांसारख्या समस्या वाढण्याची वेळ देखील असू शकते. हवामानातील बदलामुळे तुम्हालाही त्वचेच्या अशा समस्या होत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. (skin problem after monsoon Beauty Tips)

झोपण्यापूर्वी दुधामध्ये मिसळून प्या ‘या’ सुक्या लाकडाची पावडर, त्वचेवर येईल चमक

  • बदलत्या हवामानानंतर त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यानंतर तापमानात बदल होताच शरीरात पित्तदोष वाढू लागतो. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. म्हणूनच, आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  • या ऋतूत खूप कोरडे असलेले पदार्थ खाऊ नका. कुकीज, बिस्किटे आणि रस्क यांसारख्या बेकरी उत्पादनांचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये पित्त दोष वाढल्याने रक्तदाबाची पातळीही वाढते. त्यामुळे चांगला आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. (skin problem after monsoon Beauty Tips)
  • जर तुमची पचनसंस्था नीट काम करत नसेल तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे पचनसंस्थेला इजा होणार नाही अशा गोष्टींचे सेवन करा. आपली त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी, आपले पोट स्वच्छ करण्यासाठी उपाय करा.
  • तुमच्या दैनंदिन आहारात कारले, परवळ, आवळा, करवंद, नारळ आणि अंकुरलेले धान्य यासारख्या हंगामी भाज्यांचे प्रमाण वाढवा. यामुळे तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित राहते. (skin problem after monsoon Beauty Tips)
  • निरोगी त्वचेसाठी पुरेसे पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवल्याने तुमच्या त्वचेला मौसमी त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण मिळते.
  • पचायला हलके अन्न खा. यामुळे पित्त दोष टाळणे सोपे होते. गव्हाच्या पिठाच्या रोट्यांऐवजी मूग डाळ आणि ओट्स किंवा जवाच्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाव्यात. त्यामुळे अन्न सहज पचते आणि त्वचाविकारांवरही योग्य उपचार होतात. (skin problem after monsoon Beauty Tips)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी