30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्यWinter Healthy Drinks: हिवाळ्यात सर्दीने केलंय त्रस्त; हे 7 प्रकारचे ज्यूस वाढवतात...

Winter Healthy Drinks: हिवाळ्यात सर्दीने केलंय त्रस्त; हे 7 प्रकारचे ज्यूस वाढवतात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती

हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी फळांचा किंवा भाज्यांचा रस बनवून पिऊ शकता .ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

हिवाळ्यात आहाराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आजकाल शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तसेच बदलत्या ऋतूमध्ये खोकला, सर्दी यासारख्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. यासाठी लोक आपल्या आहारात अनेक प्रकारच्या आरोग्याला लाभदायक असलेल्या पदार्थांचा समावेश करत असतात. उन्हाळ्यात लोकांकडे ज्यूस पिण्याचे अनेक पर्याय असतात. परंतु हिवाळ्यात लोक शीत पेय पिणे अश्या गोष्टी टाळतात. हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी फळांचा किंवा भाज्यांचा रस बनवून पिऊ शकता .ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

गाजर रस
गाजरचा रस हिवाळ्यात पिणे खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन शरीरात असणारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. एका गाजरामध्ये 90 टक्के पाण्याची मात्रा असते. शिवाय एका गाजरात जवळजवळ 25 कॅलरिज असतात. गाजर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि तसेच फायबरने भरलेले असतात. गाजरच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.

हिरवे सफरचंद आणि संत्र्याचा रस
या फळांचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आढळतात. हा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व शरीर तंदुरुस्त राहते.

लिंबूवर्गीय फळांचा रस
लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री ,मोसंबी आणि लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. लिंबूवर्गीय फळांचा रस प्यायल्याने शरीरातील कमतरता दूर होण्यास मदत होते. अशा फळांचा रस आपल्याला निरोगी ठेऊन सर्दी सारख्या आजारापासून आपला बचाव करतात.

पालकाचा रस
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी पालक खूप चांगला असतो. त्यात कॅरोटीन, अमिनो अ‍ॅसिड, आयोडीन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. यासोबतच जीवनसत्त्वे ए, सी, केआणि बी कॉम्प्लेक्सही जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे पालकच्या रसाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

हे सुध्दा वाचा

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

PHOTO: या सहा सोप्या सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

टोमॅटोचा रस
टोमॅटो तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे व्हिटॅमिन सी हाईक उपयुक्त घटक आहे. टोमॅटो खाण्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये जवळपास 94 टक्के पाणी असते.

किवीचा रस
किवी हे एक सर्वोत्तम फळांपैकी एक फळ आहे. या फळाचा रस आरोग्यासाठी उपयुक्त असतो. हिवाळ्यात जेव्हा शरीराला ऍलर्जी आणि आजार होण्याची शक्यता असते. तेव्हा किवी सारखी फळ नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी