33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरआरोग्यTransgender :आता तृतीयपंथींना देखील मिळणार केंद्र सरकारकडून आरोग्य सुविधा

Transgender :आता तृतीयपंथींना देखील मिळणार केंद्र सरकारकडून आरोग्य सुविधा

केंद्र सरकारने तृतीयपंथींना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आता देशभरातील नोंदणीकृत तृतीयपंथींना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत

केंद्र सरकारने तृतीयपंथींना (Transgender)एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आता देशभरातील नोंदणीकृत तृतीयपंथींना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत.  त्यांच्या आरोग्याविषयी केंद्र सरकारने‍ पहिल्यांदाच सकारात्मक पाऊल उचलले आहे. काल आरोग्य प्राध‍िकरण आण‍ि सामाजिक न्याय मंत्रालयात करार करण्यात आला. देशात 4.80 लाख तृतीयपंथींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमधून त्यांना 5 लाखांपर्यंत आरोग्य व‍िमाही त्यांना प्राप्त होणार आहेत. योजनेतून 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवचही देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मंडाविया यांनी या योजनेची माहिती द‍िली.

आरोग्य मंत्रालयाकडून नोंदणीकृत प्रमाणपत्र प्राप्त तृतीयपंथींना मिळणार आहे. केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी देखील ही कल्पना उचलून धरली. देशात पहिल्यांदाच असा प्रयोग राबवण्यात येत आहे. आरोग्य विम्याचा खर्च हा सामाजिक न्याय विभाग करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार आणि आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी या करारावर संयुक्तरित्या स्वाक्षरी केली आहे. यावेळी दोन्ही खात्यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. या योजनेमुळे तृतीयपंथींना दिलासा मिळणार आहे. देशात सुमारे 4.80 लाख तृतीयपंथींची नोंदणी झालेली आहे. सामाजिक न्याय विभागाकडे याची नोंद आहे. त्यांच्याकडे प्रमाणपत्र देखील आहेत.

हे सुद्धा वाचा

Terrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

Aam Aadmi Party : आता ‘आम आदमी पार्टी’च्या 40 आमदारांवर भाजपची वाईट नजर, प्रत्येकी 20 कोटींची

ऑफर

आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. अनेक सरकारे आली आणि गेली. मात्र तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले द‍िसत नाही. आजही तृतीयपंथीना मागून खावे लागते. त्यांनी आशिर्वाद दिला की, त्यांना पैसे मिळतात. त्यांना त्यासाठी टाळी वाजवावी लागते, नाच, गाणे करावे लागते. त्यांच्यासाठी आपल्या देशात शाळा नाही. त्यांच्या जन्माला येण्यामागे त्यांचा कोणताही दोष नसतांना देखील त्यांना समाजामध्ये हिन वागणूक दिली जाते. त्यांना समाजातील लोकांकडून टोमणे ऐकावे लागतात. त्यात त्यांचा कोणताही दोष नसतो.

स्वत:चे जन्मदातेच त्यांना वाळीत टाकल्यासारखी वागणूक देतात. त्यामुळे त्यांना अनेकदा घर सोडावे लागते. त्यांच्यावर मोठया प्रमाणात लैगिंक अत्याचार होतात. मात्र कोणत्याही सरकारने अजून त्यांचे खरे घर वसवलेच नाही. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. पूर्वीच्या काळी किन्नरांना राजआश्रय तरी मिळत होता. आता त्यांना लोकशाहीतले अधिकार मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागताे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी