28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यTwins with Two Father : काय सांगता? जन्मलेल्या जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे

Twins with Two Father : काय सांगता? जन्मलेल्या जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे

मानवी शरीराबाबत घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी कल्पनाशक्तीच्या सुद्धा पलीकडच्या असतात. त्यावेळी एक निसर्गाचा चमत्कार म्हणून आपण त्याकडे पाहतो, संशोधन करतो, अभ्यास करतो आणि पुन्हा आपल्याच विचारांमध्ये गुंग होत हे कसं घडलं म्हणून स्वतःलाच विचारत बसतो. सध्याच्या काळात सगळेच जण विज्ञानाची कास धरत वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतात परंतु कधीकधी कल्पना न केलेल्या गोष्टी सुद्धा समोर येतात. असेच काहीसे पोर्तुगाल मध्ये घडले आहे. पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीने दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला परंतु ज्यावेळी त्या बाळांचा डीएनए तपासला तेव्हा दोघांचे वडील वेगवेगळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली, त्यामुळे ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीने जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यावेळी त्या दोन्ही बाळांची डीएनए टेस्ट करण्यात आली, त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. एका मुलाचे वडिल वेगळे तर दुसरे मुलाचे वेगळे असे निदर्शनास आले. वैद्यकशास्त्राच्या भाषेत याला ‘हॅट्रोपॅरेंटल सुपरफेक्यूंडेशन’ (Heteroparental Superfecundation)  असे म्हणतात. सदर घटना जगातील 20 वी असून या आधी 19 वेळा असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

Twins with Two Father : काय सांगता? जन्मलेल्या जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे

हे सुद्धा वाचा…

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांसाठी भन्नाट उपक्रम!

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Beed Fraud News : संतापजनक! मयत व्यक्तीच्या खात्यातील पैसे बँकेने हडपले

पोर्तुगालच्या मिनेरिअस या छोट्याशा शहरात ही सदर घटना घडली आहे. ज्या मुलीने बाळांना जन्म दिला तिच्या पार्टनरला बाळांबाबत संशय होता म्हणून बाळ आपलेच आहे का हे खात्री करून घेण्यासाठी त्याने बाळांच्या डीएनए टेस्टचा हट्ट धरला. त्या तरुणीने सुद्धा यासाठी होकार दिला. ज्या वेळी डीएनए रिपोर्ट आला त्यावेळी या दोघांना सुद्धा धक्का बसला कारण त्यातील एका बाळाचे वडील त्या मुलीचा सध्याचा पार्टनर असून दुसऱ्या बाळाचे वडील दुसरेच असल्याचे त्यातून सिद्ध झाले. असे काही घडेल त्या तरुणालाच नव्हे तर त्या तरुणीला सुद्धा वाटले नव्हते.

पोर्तुगालच्या या तरुणीने एकाच वेळी दोन तरुणांशी संबंध प्रस्थापित केले होते, परंतु ज्यावेळी ती तरुणी गरोदर राहिली त्यावेळी तिला या दोघांपैकी कोणा एकाचे हे बाळ असेल असे वाटले परंतु ज्यावेळी टेस्टचा रिपोर्ट हाती आला त्यावेळी मात्र तिचे धाबे दणाणले. दरम्यान या जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे असले तरीही दोन्ही मुलं दिसायला सारखीच आहेत. बाळं आठ महिन्यांचे असतांना सदर टेस्ट करण्यात आली होती आता ते दोघे अडीच वर्षांचे असून आपल्या आईसोबत मजेने जगत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी