32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeआरोग्यसुंदर दिसण्यासाठी कोरफडीचा असा करा वापर; त्वचा होईल मुलायम, केस होतील काळेभोर

सुंदर दिसण्यासाठी कोरफडीचा असा करा वापर; त्वचा होईल मुलायम, केस होतील काळेभोर

सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी केसासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतात. काहीजण पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात तर काहीजण घरच्या घरीच उपाय करत असतात. दही, कांदा, अंड, कोरफड इ. गोष्ट्रीचा वापर अनेकजण करत असतात. आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. एक सहज आणि सोपा उपाय म्हणजे कोरफड जेल. कोरफड जेलचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठी वापर केला जातो.
कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
त्वचेवर चमक येण्यासाठी कोरफड, मुलतानी माती आणि ई- व्हिटामिनची गोळी टाकून पॅक तयार करुन ठेवायचा. हा पॅक १५ ते २० मिनटे ठेऊन गार पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे त्वचेवर ताजेपणा व मुलायमपणा येतो. चेहऱ्यावरील डाग व पिंपल्स कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी