36 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरआरोग्यचक्क १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, २० किलोमीटपर्यंत वाहतूक कोंडी

चक्क १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, २० किलोमीटपर्यंत वाहतूक कोंडी

आपण अपघात पाहतो. कधी दोन-तीन गाड्या एकमेकांना धडकतात, तर कधी वेगवान महामार्गावर ८ ते १० गाड्यांची एकमेकांना धडक बसते. पण एक दुर्घटना अशी घडली आहे जिथं एक-दोन-तीन नाही तर तब्बल १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत. ही दुर्घटना आज पहाटे घडली आहे. या भीषण अपघातानंतर बराच वेळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. ती वाहतूक सुरळीत व्हायला बराच वेळ लागला. कारण अपघातामुळे महामार्ग विचित्र पद्धताने बंद पडला होता. तर ही दुर्घटना घडली आहे अमृतसर – दिल्ली महामार्गावर. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. पण त्यांचा आकडा अजून स्पष्ट नाही.

अमृतसर – दिल्ली महामार्गावर लुधियाणातील खन्ना येथे हा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेला जबाबदार आहे ते धुके. धुक्यामुळे दृष्यामानता जवळपास नव्हतीच. त्यामुळे वाहनचालकांना काहीच अंदाज येत नव्हता. त्यातच एकावर एक अशा तब्बल १०० गाड्या एकमेकांना धडकल्या. या दुर्घटनेतील छोट्या गाड्यांचं म्हणजे कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. धुक्यामुळे गाडीवर नियंत्रण ठेवणं अवघड जात होतं. शिवाय मागून येणाऱ्या चालकाला पुढचं दिसत नसल्यामुळे गाड्या धडकतच गेल्या. यात एकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी उजाडल्यावर सर्वांचा अपघाताचा अंदाज आला. तोपर्यंत अनेक जण जखमी झाले होते. पोलिसांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे.

या विचित्र अपघातानंतर उजाडेपर्यंत म्हणजे धुके विरळ होईपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने हटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर अपघात झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर काही तासांनंतर वाहतूक पूर्ववत झाली. यात जवळपास सर्वंच गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच प्रदूषण त्यातच फटाक्यांचं प्रदूषण यामुळे दृष्यमानता कमी झाली होती. त्यामुळे अंदाजे २० किलोमीटर मार्गावर अंदाजे १०० वाहनांचा अपघात झाला. आणि अपघातानंतर वाहनांच्याही २० ते २५ किलोमीटवर लांब रांगा लागल्या होत्या.

हे ही वाचा

विराटच्या गोलंदाजीवर अनुष्काला हसू आवरेना

विराटची स्वाक्षरी पाहून ऋषी सूनक काय म्हणाले?

‘गौतमी पाटीलच्या डान्सने ठाणे झाले ओव्हरस्मार्ट’

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी