33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव 'पडळकरांना' आवरावे : हेमंत पाटील

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे : हेमंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी केले आहे. केवळ फुक्कट प्रसिद्धीसाठी फडणवीसांचे ‘पाळीव’ पडळकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरात ​टीका करीत असतात. पडळकरांना प्रकाशझोतात राहण्याची एवढीच हौस असेल तर त्यांनी पवारांसारखे समाजकार्य, विकासकार्य आणि समाजकारण करावे असे आवाहन पाटील यांनी केले. (Hemant Patil’s criticism of Gopichand Padalkar)

भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या आमदार निधीचा गैरवापर करीत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.पडळकर जेव्हापासून भाजप आमदार म्हणून निवडून आले आहेत,तेव्हापासून करोना काळात त्यांनी आमदार निधीतून केलेला बोगस खर्चासंबंधी माहिती देण्यास सांगलीचे माहिती अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव 'पडळकरांना' आवरावे : हेमंत पाटील

आमदार निधीत केलेल्या भ्रष्टाचाराच्या जोरावरच पडळकर महाराष्ट्राचा दौरा करीत आहे. पडळकरांचा व्यवसाय काय? हे त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान पाटील यांनी दिले आहे. सांगली पोलिसांनी पडळकरांविरोधात चोरी तसेच खंडणीचे गुन्हे दाखल केले आहे.अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीची राष्ट्रीय नेतृत्व असलेले शरद पवार यांच्यासंबंधी बोलण्याची लायकी नाही.शरद पवार साहेबांवर खालच्या स्तरावर त्यांनी ​टीका केली होती. पंरतु, सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे. हिंमत असेल तर पडळकरांनी आपल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी,असे आव्हान पाटील यांच्यावतीने देण्यात आले आहे.

करोना काळात गोरगरीबांसाठी जो निधी देण्यात आला होता या निधीतून कोट्यवधीचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे. अशात सांगलीच्या जिल्हाधिकार्यांनी पडळकरांसंबंधी मागविण्यात आलेली माहिती पुरवण्याची विनंती देखील पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे. संबंधीत माहिती जाहीर करण्यात आली नाही, तर मोठे आंदोलन उभारू असा इशारा देखील यावेळी पाटील यांनी दिला.


हे सुद्धा वाचा : 

राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : हेमंत पाटील यांची उच्च न्यायालयात धाव

महाविकास आघाडीत बिघाडी शक्य नाही : हेमंत पाटील

शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करा : हेमंत पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी