28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रभगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

भगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

टीम लय भारी

उस्मानाबाद : धाराशिव जिल्ह्यातील शिरढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला भगवा झेंडा काढून टाकावा, असे पत्र कळंब तालुका प्रशासनाकडून देण्यात आले. यानंतर संतप्त शिरढोणकरांनी (Shirdhonkars) आत्मदहनाचा इशारा (By hoisting the saffron flag, the Shirdhonkars warned of mass self-immolation) दिला आहे. याबाबतचे निवेदनपर पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईलाही रवाना आले आहे.

शिरढोण गावातून जाणाऱ्या बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या मध्यभागी मागच्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी २७ जून २०२२ रोजी चार हजार ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत भगव्या ध्वजाचे पूजन देखील करण्यात आले. पण काही समाज कंटकांकडून भगव्या ध्वजाचे पूजन केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामुळे कळंब प्रशासनाकडून १३ जुलै ला हा भगवा झेंडा काढून टाकण्यात आला.

भगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

या घटनेनंतर गावातील महिला आपल्या लहान मुलांसह आणि इतर ग्रामस्थ भर पावसात रात्रभर हा भगवा झेंडा फडकविण्यासाठी लढा देत राहिले. आणि हा भगवा झेंडा आहे त्या जागी फडकावला. पण पुन्हा एकदा समाजातील दुसऱ्या गटाने या चौकातील सुशोभीकरणाला विरोध दर्शविला. ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

भगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशाराभगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

परंतु आता प्रशासनाकडून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ध्वज आणि नाम फलक काढून टाकण्याचे पत्र शिरढोणकर वासियांना देण्यात आले आहे. ज्यामुळे ग्रामस्थांकडून सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत एक शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचा भेटीला आले आहे. यावेळी भेटीसाठी सरपंच पद्माकर पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, किरण पाटील, नितीन पाटील, नवनाथ खोडसे आदी उपस्थित होते.

दरम्यान, हा भगवा झेंडा हिंदुत्वाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. आणि हाच भगवा झेंडा फडकविण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने हि बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे मत शिरढोणकर वासियांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा :

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

द्रौपदी मुर्मूंची देशाच्या राष्ट्रपती पदी झालेली निवड हा ‘समस्त‘ स्त्रीशक्तीचा गौरव – अजित पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी