32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं...

मेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं समंदर हूँ ‘। लैटकर वापस आउॅंगा।

टीम लय भारी

मुंबई : सकाळी घेतलेल्या शपथविधी नंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची खूर्ची सोडावी लागली. त्यानंतर राज्यात एक प्रकारची उलथापालथ झाली. उध्दव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे भाजप शिवसेना युतीमध्ये फुट पडली. त्यामुळे जिंकून आलेले देवेंद्र फडणवीस निवडणूक हरले. त्यानंतर त्यांच्या खांदयावर विरोधी पक्षाची धूरा आली.

‘मोडेन पण वाकणार नाही‘ ही भूमिका कायम ठेवून त्यांनी ‘मी पुन्हा येईन‘ अशी घोषणा केली. त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या या वाक्याला गमतीने घेतले गेले. मात्र फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसल्यानंतर देखील आपण मुख्यमंत्री होणारच असा निश्चिय केला. त्यातूनच राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेत त्याचा प्रत्यय आला. त्यानंतर सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली.

विरोधी पक्ष नेता असतांना एका विशेष अधिवेशनाच्या वेळी त्यांनी मेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं समंदर हूँ। लैटकर वापस आउॅंगा। असे टिवट केले होते. त्याची खूप चर्चा झाली. याचा अर्थ असा की,मी समुद्र आहे. समुद्राला दर साडेबारा तासांनी भरती आणि ओहोटी लागते. त्याप्रमाणेच माझे वाईट दिवस सुरु आहेत, ओहोटी लागली आहे.ओहोटी लागली म्हणजे समुद्राचे पाणी आत जाते. त्यावेळी तिथे कोणी घर बांधत नाही. कारण समुद्राला पुन्हा भरती येते. त्यावेळी त्याच्या लाटांमध्ये ते घर भरतीच्या पाण्यात वाहून जाईल.

‘मी पुन्हा येईन‘ हेच देवेंद्र फडणवीसांचे ब्रिदवाक्य असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यासाठी ते जंग जंग पछाडतांना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.

हे सुद्धा वाचा : ‘थंड‘ डोक्याचे षडयंत्र ; की ‘ईडी‘ची काडी

रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला फुकटचा सल्ला !

Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपसोबत जाण्याची तयारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी