28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंना परत आणण्यासाठी गेलेला शिवसैनिक म्हणाला, 'मला बरंच बोलायचं आहे, पण...

एकनाथ शिंदेंना परत आणण्यासाठी गेलेला शिवसैनिक म्हणाला, ‘मला बरंच बोलायचं आहे, पण पोलिसांचं लक्ष माझ्यावर आहे.’

टीम लय भारी

गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी, त्यांना समजविण्यासाठी काही आमदार तेथे गेले होते. परंतु नंतर तेच आमदार त्या गटात सहभागी झाल्याने शिवसेनेची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे आता साताऱ्यातील एक शिवसैनिकच थेट गुवाहाटीत एकनाथ शिंदेंना भावनिक साद घालण्यासाठी पोहोचले. पण त्यांना तिथल्या पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. असे त्यांनी स्वतः ‘लय भारी’ने त्यांच्याशी संपर्क साधल्यावर सांगितले आहे.

साताऱ्याचे शिवसैनिक संजय भोसले हे स्वतः एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गुवाहाटी येथे गेले. ‘शिवसेना झिंदाबाद… एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला… उद्धवजी, आदित्यजींना साथ द्या.’ अशा आशयाचे पोस्टर हातात धरून ते गुवाहाटी येथील हॉटेलच्या बाहेर उभे होते. पण त्यांना देखील तेथील पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन बसवले आहे.

मला खूप काही बोलायचे आहे. पण मला पोलिसांनी इथल्या चौकीत आणून बसवले आहे. इथल्या पोलिसांची नजर माझ्यावर आहे. मला आता काहीही बोलता येणार नाही. असे स्वतः संजय भोसले यांनी ‘लय भारी’ला सांगितले आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांच्या तावडीतून सुटून आलेले आमदार नितीन देशमुख यांनी देखील सुरत येथून पलायन केल्यानंतर त्यांच्या मागे १०० ते २०० पोलीस लागले होते. त्यांना त्यावेळी सुरत येथील पोलिसांकडून त्रास देण्यात आला. त्यांना जबरदस्तीने पोलिसांनी पकडले, से त्यांच्याकडून सांगण्यात आले.

संजय भोसले हे तर एक सामान्य शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापोटी गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घालण्यासाठी गेले होते. शांततेच्या मार्गाने हातात पोस्टर धरून ते हॉटेल बाहेर उभे होते. पण हे देखील पोलिसांना सहन झाले नाही का? त्यांना नेमके कोणत्या कारणामुळे पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे? उद्या जर या सामान्य शिवसैनिकाचे बरे-वाईट झाले तर याला नेमके कोण जबाबदार राहणार? असे प्रश्न आता समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा : 

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

अजित पवारांचा अजब दावा; म्हणे, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचे बडे नेते नाहीत

‘या ‘महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी