29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयIAS अभिजीत बांगर यांचे कौतुकास्पद पाऊल

IAS अभिजीत बांगर यांचे कौतुकास्पद पाऊल

टीम लय भारी

नवी मुंबई : महानगरपालिकेला गेल्यावर्षी मार्चअखेरीस मालमत्ता कर वसुल करण्यासाठी अनेक कायदेशीर कारवाई कराव्या लागतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी आतापासूनच करवसुलीचे नियोजन करीत प्रथम थकबाकी दारांकडून वसुली करावी; प्रसंगी कठोर कारवाई करावी, असे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले असून हे अभिजीत बांगर (IAS Abhijeet Bangar) यांचे कौतुकास्पद पाऊल आहे. (IAS Abhijeet Bangar Admirable performance)

नवीन आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाने ८०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच करवसुलीचे नियोजन करण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यात थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या ठिकाणी जाऊन अटकाव करणे, नोटीस बजावणे, खाती सील करणे अशी कठोर पावले उचलावी लागतात. त्यामुळे पहिल्या महिन्यापासूनच वसुलीसाठी हे विविध उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांना मालमत्ता विभागाला दिले आहेत.

नवी मुंबई महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षांत ६०० कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते; परंतु मागील आर्थिक वर्षांत ५६२ कोटी वसुली झाली आहे. पुढील आर्थिक वर्षांत ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य निश्चित केले असून ते १०० टक्के करण्यासाठी अखेरच्या महिन्यात ढोलताशे वाजवून वसुली करण्यापेक्षा आतापासूनच थकबाकी वसुलीचे निर्देश देण्यात आले आहेत, असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.(IAS Abhijeet Bangar Admirable performance)


हे सुद्धा वाचा : 

Navi Mumbai : रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 4 वेळा उलटली, एक ठार!

Fadnavis government : फडणवीस सरकारनेच केला मुंबईकरांचा विश्वासघात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी दिले सगळे पुरावे!

Coronavirus : उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

Coronavirus : मुंबईतील परिस्थिती चिंताजनक

Navi Mumbai: NMMC seeks objections and suggestions to relocate 9 trees in Belapur

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी