29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्रिकेट“आय. सी. सी. चे कोड्यातील प्रशासन“ : अभय गोवेकर (पुर्वार्ध)

“आय. सी. सी. चे कोड्यातील प्रशासन“ : अभय गोवेकर (पुर्वार्ध)

अभय गोवेकर, टीम लय भारीचे अधिकृत क्रिकेट तज्ञ

आय. सी. सी. च्या ठरलेल्या वार्षिक वेळापत्रकानुसार टी २० च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन त्यांनी दुबई-आबूधाबी या आखाती प्रांतात यशस्वीरित्या केले. याने मस्कत-कुवेत-ओमान या प्रगत, विकसित प्रांतात क्रिकेट आपले अस्तित्व सिध्द करुन आज उद्या येथेही नामांकित स्पर्धा खेळलेल्या आपणांस पाहवयास मिळतील. यात कोणाचेही दुमत नसेल. या भागातून नामांकित खेळाडू तयार झालेले आढळतील असा आमचा श्रीमंत क्रिकेट खेळ असेल(ICC: The administration of the puzzle, Abhay govekar)

ही स्पर्धा झाल्यावर आयसीसी एवढे संघ ज्या स्पर्धेत खेळले त्यांच्या प्रत्येक खेळाडूची, त्याच्या कामगिरीची सरासरीची नोंद ठेवून मग आयसीसी संघाची निवड करते. जो जागतिक संघ असतो.

या स्पर्धेच्या साखळी स्पर्धेत श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघातील खेळाडूंची कामगिरी काही कौतुक करण्याजोगी नव्हती. तरीही जागतिक संघात या देशांच्या खेळाडूंची निवड झालेली आहे. भारतातील क्रिकेटचे प्रेम जगप्रसिध्द आहे. क्रिकेटला तर धर्मच मानतात. समज आलेल्या लेकरापासून वयाचे बंधन नसणारे, बाळगणारे बुजुर्ग म्हातारे-कोतारे, शाळा- कॉलेज विद्यार्थी, तरूण वर्गातील स्त्री-पुरुष राष्ट्रीय खेळ नसला तरी प्रथम पसंतीचा आवडीचा खेळ आहे. अशक्याचे शक्य करणे, मानवी बुध्दीने न हरणारे, जाणारे, कोणतेही संकट जवळीक साधणे, एकत्रित येणे, संबंध प्रस्थापित करणे यासाठी क्रिकेट खेळाचाच वापर करुन यश मिळविले जाते. महत्वाच्या सामन्याच्या दिवशी आमच्या देशात कुटुंबातील कर्ते-करविते कुटुंब प्रमुख, स्त्री-पुरुष, नोकरी-धंदा, उद्योग-धंदा, व्यवसाय बंद ठेऊन, रजा घेऊन त्या दिवसाचा सणाप्रमाणे आनंद घेतात. उत्सव साजरा करतात.

“ मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखान्याची भारतीय संघास भेट ”

IND vs NZ : भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस

हा खेळ सन १२७२ साली इंग्लंडमध्ये इंग्रजांनी सुरु केला. १२९८ पासून प्रगतीस आरंभ झाला. इंग्रजांनी ज्या ज्या देशात राज्य केले, त्या त्या देशातील लोकांना त्यांनी क्रिकेटची ओळख करुन दिली. तसेच त्यांची इंग्रजी भाषा जगभर संभाषणाची भाषा व्हावी यासाठी प्रयत्न करुन त्यात यशही मिळविले. जागतिक स्तरावर आज ती बोललीही जात आहे. आमचा संग्रह शब्दांचा अपूरा असल्याने त्यांचेच शब्द आम्हाला आधार म्हणून कामी येत आहेत. जे आपण आपल्या वाक्यावाक्यात सर्रासपणे वापरून कार्यभाग साधतो. आपल्या देशात प्रथम हा खेळ राजराजवाड्यात पोहोचला. त्यांनीच या खेळास आश्रय दिला. गुणी, होतकरु, उदयोन्मुख, तरुण, हुरहुन्नरी खेळाडूंना आपल्या पदरी ठेऊन पोसले. खेळाचा आवश्यक तसेच योग्य प्रमाणात प्रचार तसेच प्रसार केला. देशातील प्रत्येक राज्यात हा खेळ पोहोचविण्याची व्यवस्था केली. भारतीय सैन्यातही हा खेळ प्रचलित झाला. देशात एवढे धर्म अस्तित्वात आहेत. अशा हिंदू, पारसी, ख्रिश्चन, मुसलमान यांचे संघ तयार झाले. आपापसात सामने रंगु लागले. आज तर या खेळास तोड नाही. आयुष्य, आरोग्य, धनधान्य, संपत्ती सर्व मनोकामना पूर्ती करुन  देणारा हा खेळ नाही तर देवताच आहे. गाडीघोडा, बंगला, नावलौकिक, गौरव, मानसन्मान, पैसा, सोनेनाणे हे सर्व वैभव क्रिकेटच देऊ शकतो. अन्य कोणत्याही खेळातील खेळाडूने प्रशासकांनी आपली तुलना क्रिकेट किंवा क्रिकेटरशी करु नये. जो क्रिकेट कृपेने पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करतो, विमानातून प्रवास करतो व सुटाबुटात फिरतो, ज्यांचा सामना पाहण्यास लाखांत स्टेडियममध्ये जमा होतात, करोडो टिव्ही वर दिवसभराचा आनंद घेतात, त्यांच्या प्रसिध्दीमुळे आपल्या कोणत्याही उत्पादनवस्तुची जाहीरात करण्यासही खेळाडूची निवड केली जाते.  सिनेमा, नाट्यसृष्टी, राजकारणीही यांचेकडे आकर्षिले जातात.

दिल्लीची लोकसभा, राज्यसभा, राज्यांतील विधानसभा, विधानपरिषद, नगरपालिका, केंद्र-राज्य सरकारच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, खाजगी कॅर्पोरेट विश्व, दिवसभरातील वेळेत विशेष रस घेऊन थोड्या थोड्या अंतराने सामन्याचा आढावा आनंदाने घेतात. क्रिकेट खेळच त्यांना आपल्याकडे आकर्षित करीत असतो, राहतो. क्रिकेट सोडून दुसरा कोणताही खेळ अशी किमया करुन दाखवू शकेल का ? १९८३ साली भारत विश्वविजेता संघ झाला, त्यानंतर देशातील अनेक उद्योगपतींनी या खेळास आपलेसे केलेले आहे. आज जगभरातील भारत सोडून इतरत्र कोठेही ज्या नामांकित स्पर्धांचे आयोजन केले जाते, त्यातील सर्वात जास्त जाहिराती आपल्या देशातील उद्योजकांकडून दिल्या जातात. आर्थिक गंगाजळी भारतातून वाहत जाते. हे सर्व आय सी सी हसत हसत जमा करते. आमच्या वाट्याचा त्यांना पूर्ण अंदाज आहे. आमच्या जाहिरातदारांकडून कोणतीही आशा, इच्छा, आकांक्षा, गैरफायदा अशांना थारा नाही. आम्ही मात्र त्यांचे देणे लागतो हे आयसीसी मधील गोऱ्या गोमट्यांना कळू नये एवढे ते मुर्ख ते नक्कीच नाहीत. पण ज्यांनी संघ निवडला त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. पण ज्यांनी संघ निवड केली त्यांना भारताचा एकही लायक खेळाडू वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. हे मुद्दामहून केलेले नाही ना ? याची खात्री करुन घेणेही गरजेचे आहे.

निर्माते-दिग्दर्शक प्रस्तुती केवळ मंडळाची-नाटक “ करतंय क्रिकेटचा भला “

‘Lightning’ Bolt Invited For T20 League After Eyeing A Career In Cricket

जागतिक टी २० संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे सोपविण्यात आलेले आहे. याच्यासोबत ११ खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. १ डेव्हिड वॉर्नर, २ अडम झॅम्पा, ३ हेझलवूड हे तीन ऑस्ट्रेलियाचे जोस बटलर (यष्टिरक्षक इंग्लंड), मोईन अली हे दोन असलंका व हसरंगा हे दोन श्रीलंकेचे, बोल्ट (न्युझीलंडचा), नॉर्कीया व मार्करम असे दोन दक्षिण आफ्रिकेचे, १२ वा म्हणून शाहिन आफ्रिदीचे नाव घोषित करण्यात आलेले आहे.

भारतापुरतेच बोलायचे झाल्यास भारताने त्यांच्या पहिल्या दोन्ही लढतीत पाकिस्तान व न्युझीलंड संघासमोर हार पत्कारली. अर्थात आव्हान संपुष्टात आले. नंतर अफगाणिस्तान व स्कॉटलॅन्ड, नामिबिया अशा लिंबू-टिंबू संघावर मात केली.  बाद फेरीतील प्रवेशासाठी एवढे पुरेसे नव्हते. आफ्रिका, लंका यांना फ्री पास वर दोन दोन खेळाडूंना घेऊन कदाचित पुढील निवडणुकींच्या मतांची व्यवस्था आजच करुन ठेवलेली आहे.

वेस्ट इंडिजचा आयन, विशप जो या संघ निवडीत ज्युरी होता हे नंतर कळले त्याच्या म्हणण्याप्रमाणे संघ निवडणे हे अतिशय जिकिरीचे काम होते. भिन्न भिन्न मते प्रदर्शित केली गेली, जे १२ संघ सुपर लीग मध्ये होते त्यांच्याकडे तसेच विजेत्यांकडे त्यांनी त्यांचे ध्यान दिले व मत-चित्त- व एकाच मनाने संघ निवड केली गेलेली आहे. टीका होऊ नये याची दक्षता घेऊन पारदर्शक निर्णय आहे. लेख पूर्ण होता होताच एक बातमी आली की, ३६ वर्षीय पाकिस्तानचा तेज गोलंदाज वधवा रियाझ २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्डकप नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. बऱ्याच काळापासून पाकिस्तान संघात स्थान मिळविण्यास त्याला शक्य झालेले नाही. पाकिस्तानात हे चालते, नवीन नाही. आपला संबंध नाही किंवा बोध घेण्यासारखे काही नाही. दुर्लक्ष हाच सहज व सुलभ उपाय. ही एक बाजू दुसऱ्या बाजूस आयसीसी च्या निवड समितीने अशी कोणती कारणे आहेत की, ज्या मुळे त्यांना पाकिस्तानच्या बाबर आझमला कर्णधार करावेसे वाटले. त्याच्याकडे असे कोणते नैसर्गिक गुण आहेत? जे इतर कोणत्याही कर्णधाराकडे नाहीत. का भारताविरुध्दचा कोणता जुना जमाखर्च आय सी सी ने निकालात काढला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी