28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे पती सदानंद सुळेंशी भांडण झाले तर...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे पती सदानंद सुळेंशी भांडण झाले तर…

टीम लय भारी

मुंबई : घरातील भांडणे घरातच सोडविली पाहीजेत. ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सोडविली जाऊ शकत नाहीत. माझे सदानंदशी भांडण झाले तर संवादातूनच मार्ग काढला पाहीजे. माझ्या तक्रारी, किंवा त्यांच्या तक्रारी दूरचित्रवाणीवर मांडून ती भांडणे मिटू शकत नाहीत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्यासारखा. त्यांच्यातील खरेपणा दिसून येतो. त्यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे. एकत्रित बसून मार्ग काढण्याविषयी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला आमदारांनी प्रतिसाद द्यायला हवा.
बाळासाहेब ठाकेर व माँसाहेब हयात असतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपले वारसदार म्हणून घोषित केले होते. त्यामुळे आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या आवाहनाचा आदर करायला हवा, असे सुळे म्हणाल्या.

राजकारणात चढउतार येत असतात. कोणताही राजकीय पक्ष हा कुटुंबासारखा असतो. कुठल्याही कुटुंबात भांड्याला भांडे लागले. रूसून गेल्यानंतर आई वडील सगळे पोटात घालून घेतात. उद्धव ठाकरेंनी सुद्धा तसेच आवाहन केले आहे. शिवसेनेच्या भाजपसोबत बैठका होणार असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना बैठका घेण्याचे अधिकार आहेत, असेही सुळे म्हणाल्या.

बंडखोर आमदारांना किती निधी मिळाला आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मला वेगळे बोलायची गरज नाही. राज्य सरकारने मोठ्या संख्येने जीआर काढले ते जनहिताच्या कामांचेच आहेत. इतक्या मोठ्या संख्येने जीआर निघतात याचा अर्थ हे सरकार चांगले काम करीत आहे, असा होतो याकडे सुळे यांनी लक्ष वेधले.

सध्या बंडखोरांतील अनेकजण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दीपक केसरकर, उदय सामंत ही मंडळी राष्ट्रवादीतच होते. त्यांनी पक्ष सोडला तरी आम्ही कधी कटुता येऊ दिली नाही. मला माझ्या आईची आणि महाराष्ट्राची संस्कृती माहित आहे. ताटातील मिठाची जाणीव ठेवली पाहीजे.

ईडीसारख्या तपास यंत्रणांनी स्वायत्तपणे काम केले पाहीजे. पूर्वी ईडी कुणालाही माहित नव्हती. आता गावातील लोकांनाही ईडी माहित झाली आहे. जे केंद्र सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना ईडीच्या नोटीसा येतात. ‘आपण भाजपमध्ये आलो. आता ईडीची चिंता नाही’ हर्षवर्धन पाटलांच्या या विधानाची सुप्रिया सुळे यांनी यावेळी नाव न घेता आठवण करून दिली.

हे सुध्दा वाचाः

राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील का?

सदा सरवणकर म्हणाले, मी भाजपला ओळखत नाही

VIDEO : कट्टर शिवसैनिक संतापला; शहाजी पाटील, तानाजी सावंतांना दिला इशारा !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी