28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeटेक्नॉलॉजीInfinix InBook X1 आणि InBook X1 Pro लॅपटॉप भारतात लाँच, पाहा किंमत...

Infinix InBook X1 आणि InBook X1 Pro लॅपटॉप भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

टीम लय भारी

मुंबई : Infinix ने भारतात लोकप्रिय InBook सिरीज लाँच केली आहे. स्मार्टफोन कंपनीने Infinix InBook X1 आणि Infinix InBook X1 Pro सह भारतीय लॅपटॉप बाजारात एंट्री केली आहे. Core i3 (8GB + 256GB), i5 (8GB + 512GB), i7 (16GB + 512GB) या तीन प्रोसेसर व्हेरिएंटमध्ये लॅपटॉप उपलब्ध होणार आहे(InBook X1 Pro laptop launched in India)

हे लॅपटॉप नवीन Windows 11 वर चालतात. Infinix InBook X1 आणि Infinix InBook X1 Pro हे वजनाला अत्यंत हलके मानले जातात आणि ते कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये येतात. (Infinix InBook X1, InBook X1 Pro launched With Windows 11, Price Starts from 35,999)

मुंबईतील शाळा पुन्हा सुरू होणार?

अकोला विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर प्रविण दरेकर म्हणाले…

नवीन लाँचबद्दल बोलायचे तर, Infinix India चे CEO अनिश कपूर म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार आमच्या ऑफर तयार करण्याचा सतत प्रयत्न करतो. ग्राहकांना घरामध्येच राहणे आणि त्यांच्या घरातून-कामाच्या जीवनशैलीची सवय होत असल्याने, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

कोरोना महामारीमुळे लॅपटॉप हे प्रत्येकासाठी, विशेषतः विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक आणि तरुण उद्योजकांसाठी अतिशय आवश्यक साधन बनले आहे. त्यांच्या वेगवान आणि ‘मोबाइल’ जीवनशैलीला पूरक होण्यासाठी त्यांना लॅपटॉपची गरज आहे.”

भारतीयांना लागलं प्लास्टिक सर्जरीचं वेड! काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या

The Infinix INBook X1 Pro has a Core i7 Processor for Under Php 40k

अनिश कपूर म्हणाले की, ‘नवीन Infinix InBook द्वारे, आमच्या ग्राहकांना एक असे उत्पादन ऑफर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो केवळ त्यांच्या मल्टी-टास्किंग गरजा पूर्ण करत नाही, तर उत्कृष्ट व्हिज्युअल आणि प्रोसेसिंग क्वालिटी देखील देऊ करेल. तसेच, त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा दोन्हीची पूर्तता करेल.’

Infinix Inbook X1, Inbook X1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Infinix InBook X1, Infinix InBook X1 Pro हे लॅपटॉप्स 1920×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 14 इंचाच्या डिस्प्लेसह उपलब्ध आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 16: 9 आहे, ब्राइटनेस 300 nits आहे. लॅपटॉपमध्ये अॅल्युमिनियम ग्रेड फिनिशसह ऑल-मेटल बॉडी दिली गेली आहे. मेटल बॉडी असूनही, लॅपटॉपचे वजन फक्त 1.48 किलो आहे आणि तो 16.3 मिमी इतका स्लीम आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे, Infinix InBook हा नवीन लॅपटॉप Intel Core प्रोसेसरवर चालतो आणि Core i3, Core i5 आणि Core i7 सह तीन प्रकारांमध्ये येतो. Infinix INBook i7 प्रोसेसर व्हेरिएंट इंटेल आइस लेक कोअर i7 चिपसेटसह सुसज्ज आहे, जो टॉप स्पीड परफॉर्मन्सची गॅरंटी देतो. i3 आणि i5 व्हेरिएंट्स इंटेल UHD ग्राफिक्स युनिटसह येतात, तर i7 Advance, इंटिग्रेटेड Iris Plus च्या 64EU ग्राफिक्स युनिटसह येतात. i3 आणि i5 दोन्ही 8GB DDR4X RAM सह ड्युअल-चॅनल मेमरीमध्ये येतात, तर i7 16GB DDR4X रॅमसह येतात.

Infinix InBook X1, Infinix X1 Pro मध्ये 55Wh ची हाय कमॅसिटी असलेली बॅटरी आहे, जी 13 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देते. ही बॅटरी 65W फास्ट टाइप-सी चार्जर सपोर्टसह येते, जी लॅपटॉपला 55 मिनिटांत 70% पर्यंत चार्ज करू शकते.

Infinix Inbook X1, Inbook X1 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Infinix InBook X1 Core i3 प्रोसेसर व्हेरियंटसाठी 35,999 रुपये, Core i5 व्हेरिएंटसाठी रुपये 45,999 आणि Core i7 साठी 55,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. रेड, ब्लू आणि स्लेट ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्ये लॅपटॉप उपलब्ध आहेत. Infinix Inbook X1, X1 Pro मध्ये अॅल्युमिनियम फिनिशसह लाइटवेट मेटल बॉडी असेल. Infinix X1 आणि InBook X1 Pro डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी