31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईविलेपार्ले येथे इंडिया वाॅटर व्हिजन 2040 परिषद

विलेपार्ले येथे इंडिया वाॅटर व्हिजन 2040 परिषद

टीम लय भारी 

मुंबई : ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशनने जलसंवर्धन आणि जल नियोजनाबाबत विचारमंथन आणि धोरणात्मक कृतीशील आऱाखडा तयार कऱण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांच्या सहयोगाने इंडिया वाॅटर व्हिजन (India Water Vision 2040) या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. India Water Vision 2040 Conference at Vile Parle

मंगळवारी 12 एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विलेपार्ले येथील बी.जे सभागृहात ही परिषद होणार असून या परिषेदेचे उद्घाटन केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांच्या हस्ते होणार आहे.

या परिषदेत राष्ट्रीय जल परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने देशातील पाण्याची परिस्थिती आणि वातावरण बदलाचा पाण्यावर होणारा परिणाम यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या परिषेदत इस्त्रायलचे जल व्यवस्थापनाचे माॅडेल तज्ज्ञांद्वारे सादर करण्यात येणार असून, हे माॅडेल देशात कशा पद्धतीने राबविण्यात येईल याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. India Water Vision 2040 Conference at Vile Parle

या परिषदेत यशस्वी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, तळागाळातील पाणी व्यवस्थापनावर आधारित देशातील पहिला वाॅटर स्टार्टअप यांचा सहभाग असणार आहे. तसेच, परिषदेत जल संवर्धन क्षेत्रातील कर्मचारी देशभरात राबविलेल्या विविध अनुभवांचे कथन करणार आहेत.
जल परिषदेत केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते यशस्वी जलसंवर्धन प्रकल्पांच्या माहिती-अभ्यास पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, जल संवर्धन – व्यवस्थापन (India Water Vision 2040) क्षेत्रातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, व्यक्ती आणि संस्थांनाही परिषदेत सन्मानित कऱण्यात येणार आहे. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रावर परिणाम करणारा पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून पाण्याविषयी आर्थिक व तांत्रिक क्षेत्राच्या अनुषंगाने बदल करण्याबद्दल या राष्ट्रीय जल परिषदेत चर्चेचे आयोजन केले आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या सीओपी26 (COP26) ग्लासगो क्लायमेट चेंज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्बन न्यूट्रल वॉटर पॉझिटिव्ह आणि शून्य डिस्चार्जचे ध्येय साध्य होत आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे आहे, अशी माहिती ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक – संचालक डॉ. विजय पागे यांनी दिली आहे.

हे सुध्दा वाचा

मुंबईतील 15 टक्के पाणीकपात रद्द

पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायत कार्यालय फोडले

सिल्वरओक ला भेट घेतल्यानंतरची संजय राऊतांची यांची प्रतिक्रिया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी