30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटभारताने महिला विश्वचषकात मारली बाजी ; ३०० पेक्षा अधिक धावा करणारा जगातील...

भारताने महिला विश्वचषकात मारली बाजी ; ३०० पेक्षा अधिक धावा करणारा जगातील सहावा संघ

टीम लय भारी

हॅमिल्टन :  वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट पटू सलामीवीर स्मृती मानधनानं शतक झळकावलं आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ च्या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ८ बाद ३१७ धावा केल्या.

महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. महिला विश्वचषकात ३०० पेक्षा अधिक धावा करणारा भारत जगात सहावा संघ ठरला असून, भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी महिला विश्वचषकात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या संघाने पाच वेळा, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघाने २ वेळा हा पराक्रम केला आहे.


याआधीची सर्वोच्च धावसंख्या ५० षटकात ६ बाद २८४ होती, जी ३१ जानेवारी २०१३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच केली होती. विशेष म्हणजे तेव्हाही भारतीय संघाचं नेतृत्व मिताली राजच्याच हाती होतं. भारताने हा सामना १०५ धावांनी जिंकला होता.


या सामन्यात स्मृती मानधनाने ११९ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच वेळी, हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंच्या खेळीत १० चौकार आणि २ षटकार ठोकत, १०९ धावा करून दमदार साथ दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी