31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeजागतिकअरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

टीम लय भारी

कॅनबरा:ऑस्ट्रेलियात भारतीय नागरिकांची लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.ऑस्ट्रेलियन ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स यांनी 2016 मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये हे स्पष्ट झाले होते की,ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत आहे. त्यानंतर1 जून 2021 मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये ही संख्या आणखी वाढली असल्याची निदर्शनास आले आहे. यामध्ये हिंदू धर्मातील नागरिकांची संख्या जास्त आहे. आता हिंदूंची संख्या 2.7 टक्के आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच धर्म न मानणाऱ्यांची संख्या 9 टक्के आहे.

ताज्या माहितीनुसार 1 जून 2021 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतीय वंशाच्या लोकांची संख्या 6,73,325 आहे. 2016 च्या गणनेमध्ये ही संख्या 4,55,389 होती.भारतीयानंतर दुसरा क्रमांक नेपाळचा लागतो. 1जुन 2021 मध्ये नेपाळी लोकांची संख्या संख्या ही 67,752 होती. तर ईसाई नागरिकांची संख्या कमी झाली आहे. 2016 च्या गणनेत ही संख्या 90 टक्के होती. आता ती संख्या 44 टक्के झाली आहे.

हे सुध्दा वाचा:

फडणवीसांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा

कलम 370 हटवूनही ‘अमरनाथ‘ यात्रेवर संकटाची टांगती तलवार

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी