29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयभारतातील सर्वांत वृध्द वाघाचा मृत्यू

भारतातील सर्वांत वृध्द वाघाचा मृत्यू

टीम लय भारी

बंगाल: भारतातील सर्वांत वृध्द वाघाचा मृत्यू झाला आहे. काल त्याचा मृत्यू झाला. त्याचे वय 26 वर्ष 10 महिने 18 दिवस होते. त्याचे नाव राजा होते. राजाला अलीपुरच्या टायगर पुर्नवसन सेंटरमध्ये ठेवले होते. तो सर्वांत जास्त काळ जगणारा वाघ ठरला. साधारणपणे वाघाचे आयुष्य 10 ते 15 वर्षांचे असते. म्हणून तो सर्वांत वृध्द वाघ ठरला.

राॅयल बंगाल टायगरचा 27 वा वाढदिवस साजरा होणार आहे. वनविभागाने त्याच्या वाढदिवसाची तयारी केली होती. सोमवारी त्याने 3 वाजता श्वास सोडला. वृध्दत्वामुळे त्याचा मृत्यू झाला. राॅयल बंग टायगरला म्हणजेच राजाला वनविभागाने श्रध्दांजली वाहिली. राजाला सुंदरवनात 2006 मध्ये पकडले होते. सुंदर वनात मातला नदी पार करतांना मगरीने त्याच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. जिल्हाधिकरी मीणा यांनी सांगितले की, तो वृध्दत्वामुळे गंभीर आजारी होता. त्याची शल्यचिकित्सा करण्यात आली.

भारतातील सर्वांत वृध्द वाघाचा मृत्यू

जाणून घ्या वाघा विषयी आणखी महत्वाची माहिती:

संपूर्ण जगामध्ये 70 टक्के वाघ भारतात आढळतात. भारतात वाघांची संख्या वाढत आहे. वाघाला जन्माला आल्याबरोबर लगेच दिसत नाही. एक आठवडयानंतर दृष्टी येते. बहुतांश वाघ तरुणपणीच मृत्यू पावतात. दोन वर्षांपर्यंत पिल्लांची देखभाल मादी वाघ करते. वाघाला रात्रीच्या अंधारात चांगले दिसते. वाघाची डरकाळी 3 किमीपर्यंत ऐकायला येवू शकते. वाघ 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो. वाघ हा जवळजवळ आठ मीटर लांब पाच मीटर लांब उंच उडी मारु शकतो.

वाघाचे पाठीमागचे पाय पुढच्या पायांपेक्षा लांब असतात. वाघ साधारपणे दहा ते पंधरा वर्षे जगतो. अनेक वेळा पंचवीस वर्षे जगतो. दुरच्या वाघाशी संवाद साधण्यासाठी वाघ डरकाळी फोडतो.जंगली वाघाला खूप भूक लागते. वाघ तीन आठवडे भुकेला राहिला, तर त्याचा मृत्यू होतो. वाघ भक्षाचा गळा पकतो. वाघाचे दात दहा सेंटीमीटर असून खूपच मजबूत असतात.

भारतात वाघाच्या शिकारीवर बंदी आहे. त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाची विक्री करणे हा कायदयाने गुन्हा आहे. सायबेरियन वाघ ही सर्वांत मोठी वाघाची जात आहे.वाघ सोळा तास झोपतो. मादी वाघ एका वेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देते. वाघीणीच्या गर्भधारणेचा काळ साडेतीन महिन्यांचा असतो.

हे सुध्दा वाचा:

पुण्याची पाणीबाणी टळली

दहशतवादांच्या निशाण्यावर RSS कार्यालय?

सोबत शस्त्र बाळगताय….? हे जरुर वाचायलाच हवे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी