28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्रिकेटआयपीएल संघ मुंबईत दाखल!

आयपीएल संघ मुंबईत दाखल!

टीम लय भारी

यंदा आयपीएल स्पर्धा मुंबई आणि पुण्यातील स्टेडियम्समध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल 2022 स्पर्धेची सुरुवात 26 मार्चपासून होतं आहे. मुंबईतील तीन स्टेडियम्समध्ये लीग स्टेजचे सामने होतील. आज या स्पर्धेसाठी मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये काही संघाचे स्वागत करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स एका ग्रुपमध्ये आहेत. ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्येही सामने आयोजित केले जातील. मुंबईच्या वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. कोविडमुळे फक्त मर्यादीत स्टेडियम्समध्ये सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी