28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeमुंबईISC बारावी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर, उपासना नंदी देशात पहिली

ISC बारावी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर, उपासना नंदी देशात पहिली

टीम लय भारी

मुंबई : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) ने आज संध्याकाळी 5 वाजता ISCच्या 12वीचा निकाल 2022 जाहीर केला, त्यामुळे इतक्या दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या बोर्डाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अखेर निकालाचा मुहुर्त लागला. ISC 12वीचा निकाल CISCE ने cisce.org, results.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केला असून विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे निकाल बघता येणार आहे.

महाराष्ट्राचा यंदाचा आयसीएसई बारावी बोर्डाचा निकाल 99.76 टक्के इतका लागला असून यावर्षी सुद्धा निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात 99.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर  99.26 टक्के मुले उत्तीर्ण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशभरातून एकूण 96940 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर 18 विद्यार्थ्यांनी 99.75 टक्के गुण मिळवत पहिल्या क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातून ठाण्यातील सिंघानिया शाळेची उपासना नंदी ही विद्यार्थिनी या 18 जणांसोबत पहिली आली आहे.

निकाल कसा पाहाल?

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर लाॅगीन करा.
  • होम पेज दिसेल, त्यावर ‘ISC निकाल 2022’ या लिंकवर क्लिक करा.
  • ‘ISC वर्ग 12वी निकाल 2022’ स्क्रीनवर उघडेल.
  • आवश्यक ते डिटेल्स भरा.
  • ते तपासा आणि निकाल डाऊनलोड करा.

हे सुद्धा वाचा…

द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा उद्या होणार शपथविधी

‘तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध’, मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

शिवसेनेचे हकालपट्टी सत्र सुरूच, पक्षविरोधी कारवाई केल्याने आणखी सात जणांवर कारवाई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी