महाराष्ट्रराजकीय

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर भाजपचे आडदांड आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore) यांच्यासह तिघांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल झाला आहे. चार वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार केल्याने आमदार गोरे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

टीम लय भारी

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर भाजपचे आडदांड आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यासह तिघांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल झाला आहे. चार वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार केल्याने आमदार गोरे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. (Jayakumar Gore has been charged with ‘atrocity’)

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

मायणी येथील मयत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून भाजपाचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यासह दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे ( बिदाल, ता. माण ) व अज्ञात दोघांनी संगनमत करून जमीन हडपण्यासाठी फसवणूक केली आहे. त्या प्रकरणी आ.गोरेंसह पाच व्यक्तींवर फसवणुक व ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्यासंबंधीची फिर्याद मयत पिराजी भिसे यांचे वारसदार महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलिसांत दाखल केली आहे. याबाबतची माहिती अशी : मायणी येथील पिराजी विष्णू भिसे हे आठ ऑक्टोंबर २०१६ रोजी वृद्धापकाळाने मयत झाले आहेत. त्यांचे नावे गट नं ७६९, ७८१ व ८१२ मध्ये वडिलोपार्जित जमिन आहे. त्यांचे वारस म्हणुन पत्नी नमुनाबाई पिराजी भिसे, मुले महादेव भिसे, शंकर भिसे, हरि भिसे, विठ्ठल भिसे, मुली लक्ष्मी नाथा वायदंडे व रुक्मिणी शशिकांत अवघडे यांचेसह शुभम शिवाजी भिसे हे वहिवाट करीत आहेत.

वडिलोपाजीत मिळकत गट नं ७६९, लगत गट नं ७६८ ही छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी मायणी तर्फे तत्कालीन अध्यक्ष यांचे मालकी कब्जात वहिवाटीचे आहे. विद्यमान भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार भगवान गोरे यांच्या संस्थेच्या मिळकतीत जाण्यासाठी अधिकृत रस्ता नसल्याने त्यांनी भिसे यांच्या वडिलोपार्जित मिळकतीतून रस्ता मागणीसाठी सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांचे कार्यालयाकडे अर्ज दिलेला होता. त्यानुसार सातारा प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियमानुसार पंधरा मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी लागणारी जमीन व संबंधित मालकाची परवानगी घेणे बंधनकारक होते.

मात्र, तशी कोणतीही परवानगी न घेता आमदार गोरे यांनी दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे, महेश पोपट बोराटे, व अज्ञात दोघे (प्रतिज्ञापत्रावर सही करणारा आणि बोगस आधारकार्ड तयार करणारा) यांनी संगनमत करून मयत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार केली. मयत भिसे यांचे जागी कोणी तरी अज्ञात इसम उभा करून त्याचे नावे ११ डिसेंबर २०२० रोजी दहिवडी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र करण्यात आले आहे. भिसे कुटुंबाची फसवणुक करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेय कोंडीबा घुटुकडे यांचे नावे शंभर रुपयांचा स्टॅम्प घेऊन प्रतिज्ञापत्रात बोगस व खोटा मजकुर लिहिण्यात आला आहे. (Jayakumar Gore has been charged with ‘atrocity’)

तसेच भिसे यांच्या मुळ आधारकार्डाची छेडछाड करुन बनावट आधारकार्ड तयार करून घेण्यात आले आहे. मूळ आधारकार्ड नं ९०१३१५२०१५९५ असा असताना तो ५०७२१५७८८२१३ करण्यात आला आहे. भिसे अडाणी व अशिक्षित होते. त्यांना इंग्रजीचे अजिबात ज्ञान नव्हते. मात्र, प्रतिज्ञापत्रावर इंग्रजीमध्ये त्यांच्या नावे सही करून दुस-याच तोतया अनोळखी इसमाचा फोटो लावला आहे. ती सर्व बोगस कागदपत्रे सहाय्यक संचालक नगररचना सातारा उपविभागीय अधिकारी माण खटाव यांच्या कार्यालयात दाखल करून फसवणुक करण्यात आली आहे.

त्यामुळे आमदार जयकुमार भगवान गोरे (Jayakumar Gore) यांच्यासह दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे, महेश पोपट बोराटे, अनोळखी इसम (पिराजी विष्णु भिसे यांचे नावे ऑफिडेव्हीट करणारा व बनावट आधारकार्ड बनविणारा संगणकतज्ज्ञ यांचेवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करून न्याय मिळाला, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध प्रकारची १४ आणि ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत दोन कलमे लावण्यात आली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश देशमुख अधिक तपास करत आहेत.(Jayakumar Gore has been charged with ‘atrocity’)


हे सुद्धा वाचा : 

प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

भाजपचा कुणी नेता महिलांना कमी लेखतो, तर कुणी दलित – झोपडपट्टीवासियांची थट्टा करतो

Maharashtra: Centre approves Laxmanrao Inamdar Lift Irrigation scheme in Satara district

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close