31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयभाजप आमदारावर गंभीर गुन्हा दाखल, अटक करण्यासाठी पोलिसांकडून चालढकल !

भाजप आमदारावर गंभीर गुन्हा दाखल, अटक करण्यासाठी पोलिसांकडून चालढकल !

टीम लय भारी

सातारा : ॲट्रॉसिटी, बोगस कागदपत्रे तयार करणे, मृत व्यक्तीच्या नावाने स्वाक्षरी करणे असे गंभीर गुन्हे भाजपच्या आमदारावर दाखल झाले आहेत. पण १५ दिवस उलटले तरी या आमदाराला पोलिसांनी अटक केलेली नाही. जयकुमार गोरे (Jayakumar Gore) असे या आमदाराचे नाव आहे. त्यामुळे सामान्य माणसाला वेगळा न्याय व आमदारांना वेगळा न्याय अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होतं आहे. आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दिलीप तुपे व किशोर सोनवणे हे बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत.

आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असून याबाबत माण तालुक्यातील त्यांच्या प्रतिस्पर्धीकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. या अशा गंभीर प्रकरणा ते गप्प का आहेत? अशी खंत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी व्यक्त केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावरील गुन्हे खरे किंवा खोटे हे तपासाअंती न्यायालयामध्ये सिद्ध होईल. पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारची टाळटाळ करु नये अशी जनसामान्यांची भावना आहे.

निवडणुकींच्या वेळी एकमेकांचे नावाने नुसते ढोल बडवले जातात. परंतु विरोधी नेत्यांवरती प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना त्यांचेवरती झालेल्या अन्याय अडवणूक, पिळवणूक तसेच फसवणुकी बाबतचे काही गंभीर गुन्हे दाखल करावे लागले की “तेरी भी चुप, मेरी भी चुप” या म्हणी प्रमाणे हे माणचे पुढारी गप्प का असतात? असा प्रश्न भोसले यांनी केला आहे.

पेड न्यूजसाठी धडपडणारे आणि रखानेच्या रखाने भरुन खोटी बातमी प्रसिध्द करणारे काही पत्रकार देखील याला अपवाद नाहीत. सामान्य जनतेचा आवाज उठविताना अशा पत्रकारांची शाई सुकलेली असते. न्याय हा घटनेने दिलेला सामान्य नागरिकांचा हक्क आहे. जेणेकरुन माणूस कितीही मोठा असो खर्‍याला न्याय मिळायला हवा परंतु गुन्हा खोटा असेल तर कोणाची बदनामी व त्यांना नाहक त्रास होता कामा नये ही कायद्यातील तपास यंत्रणाची जबाबदारी आहे असं मतही भोसले यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

‘It’s shocking’: Kirit Somaiya says Mumbai Police accepted filing fake FIR in his name

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी