29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयपवारसाहेबांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री सक्षमपणे करून कडक कारवाई करतील - जयंत...

पवारसाहेबांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री सक्षमपणे करून कडक कारवाई करतील – जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई:  एसटी आंदोलनाला खतपाणी कुणी घातले? त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली? न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली आहे.Jayant Patil criticize Bjp and mns

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी माध्यमांनी त्यांच्या सोबत संवाद साधला आहे. जयंत पाटील यांनी पवारसाहेबांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर भाष्य केले.

पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई असा विश्वास व्यक्त केला. पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे अशी जोरदार टीका प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

मनसेची तशीही मते भाजपला मिळणार नाही म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजप घाबरत आहे. भाजपची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची इच्छा फार आहे पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे

जयंत पाटलांचा 112 आपत्कालीन नंबरला फोन! 15 मिनिटात मिळाली पोलिसांची मदत

एसटी संपाचा सुटलेला तिढा पुन्हा एकदा गुंतला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी